शासकीय तंत्रनिकेतन
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:31+5:302015-02-11T00:33:31+5:30
आज शासकीय तंत्रनिकेतनचा दीक्षांत समारंभ

शासकीय तंत्रनिकेतन
आ शासकीय तंत्रनिकेतनचा दीक्षांत समारंभनागपूर : स्थापनेची १०० वर्षे साजरी करत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनचा १७ वा दीक्षांत सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता तंत्रनिकेतनच्या परिसरात होणाऱ्या या सोहळ्यात ७०६ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहेत. यंदा स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील वैभव राजेश्वर घुशे या विद्यार्थ्यांने सर्वाधिक ६ सुवर्णपदके पटकावली आहेत. दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे व तंत्रशिक्षण सहसंचालक गुलाबराव ठाकरे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. यंदापासून पदविका प्रदान समारंभामध्ये तीन नवीन पुरस्कार प्रायोजित करण्यात आली आहेत. वैभव घुशे या विद्यार्थ्यानेे सर्वाधिक ९३.१९ टक्के गुण प्राप्त केले असून तो सर्व विभागातून प्रथम आला आहे. तर या खालोखाल हिमांशू संजय करडभाजणे (अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी ), कृतिका उमाजी पांडे (वस्त्रनिर्माण तंत्रज्ञान), दीपक केशवराव सोनवणे ( स्वयंचल अभियांत्रिकी) यांचाप्रत्येकी तीन सुवर्णपदके देऊन सत्कार करण्यात येणार आहे.