तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुलींची बाजी

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:19+5:302014-12-20T22:27:19+5:30

वडवळ : जि़ प़ शिक्षण विभाग, सोलापूर व पं़ स़ शिक्षण विभाग मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या जिल्हास्तरीय विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेतील वक्तृत्व स्पर्धेत लहान व मोठय़ा गटात अनुक्रमे गायत्री माने-देशमुख, धनर्शी पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला़ या स्पर्धेत चारही क्रमांक मुलींनीच पटकाविल़े

Girls bet on taluka level oratory | तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुलींची बाजी

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुलींची बाजी

वळ : जि़ प़ शिक्षण विभाग, सोलापूर व पं़ स़ शिक्षण विभाग मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या जिल्हास्तरीय विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेतील वक्तृत्व स्पर्धेत लहान व मोठय़ा गटात अनुक्रमे गायत्री माने-देशमुख, धनर्शी पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला़ या स्पर्धेत चारही क्रमांक मुलींनीच पटकाविल़े
मोहोळ येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयात या स्पर्धा पार पडल्या़ यावेळी गटविकास अधिकारी आशालता सुरवसे, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, अविनाश गोडसे, सुवर्णा गुरव, रुपेश क्षीरसागर उपस्थित होत़े परीक्षक म्हणून प्रकाश शिंदे, प्रमोद कोरे, अशोक कदम, तानाजी देशमुख यांनी काम पाहिल़े सूत्रसंचालन सत्यवान खंदारे यांनी केले तर आभार सुवर्णा गुरव यांनी मानल़े (वार्ताहर)

इन्फो बॉक्स
स्पर्धेचा निकाल
लहान गट : प्रथम - गायत्री माने-देशमुख (चव्हाणवाडी व़े ता़ माळशिरस), द्वितीय - मनस्वी गादेकर (कुसळंब, ता़ बार्शी)़
मोठा गट : प्रथम - धनर्शी पाटील (अंजनगाव उमाटे, ता़ माढा), द्वितीय - काजल गायकवाड (शिरसी, ता़ मंगळवेढा)़

Web Title: Girls bet on taluka level oratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.