यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

By Admin | Updated: February 5, 2016 00:33 IST2016-02-05T00:33:17+5:302016-02-05T00:33:17+5:30

जळगाव : मेहरूण येथील यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात १९९७-९८ वर्षातील १०वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला. १०वीच्या माजी ५३ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष सदाशीव सोनवणे, उपाध्यक्ष अरुण सानप, सचिव बाळकृष्ण पाटील, सदस्य रविराज पगार व पदाधिकारी उपस्थित होते.

Former students of Yadava Devchand Patil Secondary School meet | यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

गाव : मेहरूण येथील यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात १९९७-९८ वर्षातील १०वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला. १०वीच्या माजी ५३ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष सदाशीव सोनवणे, उपाध्यक्ष अरुण सानप, सचिव बाळकृष्ण पाटील, सदस्य रविराज पगार व पदाधिकारी उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एम.खंबायत यांनी केले.
विद्यार्थ्यांपैकी विजय भोरडे, गणेश पाटील, सविता पाटील, दीपाली सानप, विनोद चौधरी, सचिन पाटील, रत्नमाला कोल्हे, उमाकांत जंजाळकर यांनी शालेय जीवनातील आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. शिक्षकांपैकी लोखंडे व पी.ए.महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन दुर्गादास नेरकर व विनोद चौधरी यांनी केले. आभार मंगेश बेडीस्कर यांनी मानले. माजी विद्यार्थ्यांकडून आयोजित स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाने मेळाव्याचा समारोप झाला.

Web Title: Former students of Yadava Devchand Patil Secondary School meet