जेईई मेन परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:54+5:302014-12-20T22:27:54+5:30
जेईई मेन परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

जेईई मेन परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
ज ईई मेन परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ२६ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणारमुंबई :देशातील आणि राज्यातील अभियांत्रिकी आणि आयआयटीच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणार्या जेईई मेन परीक्षा अर्ज भरण्यास राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे. परीक्षेला बसू इच्छिणार्या विद्यार्थ्यांना २६ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.शैक्षणिक वर्ष २0१५-१६ करिता राज्यातील चार वर्षे कालावधीच्या अभियांत्रिकी/ तंत्रशास्त्र पदवी अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश जेईई मेन परीक्षेच्या आधारे करण्यात येणार आहेत. राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना जेईई मेन्स परीक्षा देणे अनिवार्य आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत असून, अर्ज भरण्यास तंत्र शिक्षण संचालनालयाने २६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापुर्वी अर्ज भरण्याची मुदत १८ डिसेंबरपर्यंत होती.दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात येणारी जेईई मेनची पेन ॲण्ड पेपर बेस्ड परीक्षा ४ एप्रिल आणि १0 ते ११ एप्रिल रोजी कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा घेण्यात येणार आहे.