टेकफेस्टमध्ये अनुभवता येणार उत्कंठतावर्धक क्षण
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:57+5:302014-12-20T22:27:57+5:30
टेकफेस्टमध्ये अनुभवता येणार उत्कंठतावर्धक क्षण

टेकफेस्टमध्ये अनुभवता येणार उत्कंठतावर्धक क्षण
ट कफेस्टमध्ये अनुभवता येणार उत्कंठतावर्धक क्षणमुंबई :आयआयटी मुंबईचा तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित टेकफेस्ट २ ते ४ जानेवारीदरम्यान आयआयटी कॅम्पसमध्ये पार पडणार आहे. टेकफेस्टच्या टेक्नोहोलीक्स या सत्रात तंत्रप्रेमींना जागतिक पातळीवरील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घातलेल्या लक्षवेधक कार्यक्रमांचे उत्कंठतावर्धक क्षण अनुभवता येणार आहेत.आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये अमेरिका, रशिया, जर्मनी, ब्रिटन आदी असंख्य देशातील तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यासह तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक स्तरावरील मान्यवर तज्ज्ञ, संशोधकही यामध्ये सहभागी असतील. तीन दिवस चालणार्या या टेकफेस्टमध्ये तंत्रज्ञान व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना लाभणार आहे. यासह रोबो, सुपर कारचे प्रदर्शन आणि विविध विषयांवर संवाद करणार्या रोबोचे अनोखे प्रयोग टेकफेस्टचे आकर्षण ठरणार आहे.टेक्नोहोलीक्स या सत्रातील इन्नर पीस या शोमध्ये ऑस्ट्रियातील जगप्रसिद्ध कलावंत थ्री डी माप्पिंग शो करणार असून तो सर्व रसिकांसाठी दुर्मिळ अनुभव असणार आहे. तसेच अडेलेडा या शो मध्ये पाय्रोटेकनिक्स आणि डान्स दोन्ही असणार आहे. यामध्ये युक्रेनचे कलावंत भाग घेणार आहेत. तर खावोटर अल्दालाम या कार्यक्रमात वेगवेगळ्या रंगांच्या एलईडी लाइट्सचा वापर कल्पकतेने केला जाणार आहे. तसेच ते नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणाचा संदेश या कार्यक्रमातून देणार आहेत. फर्स्ट प्रोजेक्ट हा शो टेकफेस्ट २०१५ ची ओळख ठरणार आहे. ामध्ये फक्त ड्रमचा वापर केला जाणार आहे. तसेच ओझोन या इव्हेंटमध्ये विज्ञान आवडणार्या आणि न आवडणार्या सर्वांचे मनोरंजन होणार आहे. हा इव्हेंट विनामूल्य असून यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा, वर्कशॉप, सेटअप्स आणि लक्षात राहण्यासारखे स्ट्रीट इव्हेंट्सचा समावेश असणार आहे.ओझोन इव्हेंटमधील फ्लाइंग स्टीम्यूलेटर या प्रकारात जमिनीवर राहून आकाशात उडल्याचा अनुभव घेता येईल. त्याचप्रमाणे पेंटबॉल, लेझर टॉग, बंगी रन, अचेर्री तंत्रप्रेमींना वेगळाच अनुभव देतील. तसेच आंतरराष्ट्रीय कलावंतही यामध्ये जादूचे प्रयोग सादर करणार आहेत.