राजपथ गाजविणाऱ्या कलावंतांचे भावपूर्ण स्वागत (भाग २)
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30
खूप चांगला अनुभव

राजपथ गाजविणाऱ्या कलावंतांचे भावपूर्ण स्वागत (भाग २)
ख प चांगला अनुभव हा अनुभव आम्हाला खूप शिकविणारा आणि ऊर्जा देणारा होता. आपल्या देशासाठी आपण काहीतरी करतोय अशी भावना देणारा होता. यानिमित्ताने दिल्लीत महाराष्ट्राची संस्कृती सादर करण्याची संधी मिळाली. याचा आनंद वाटतो. राखी शर्मा, सेंट अन्थोनी हायस्कूल, अजनी---------पंतप्रधानांसमोर नृृत्य करण्याचा आनंद वेगळा आपण जे सादर करतोय ते आपल्या देशाचे पंतप्रधान पाहात आहे, याचा आनंद खूप मोठा होता. दिल्लीचे वातावरण त्यामुळे अनुभवता आले. मोदींनाही जवळून पाहता आले. तेथे आमची व्यवस्था छान होती. तेथून परत येण्याची इच्छाच होत नव्हती. पारितोषिकाने तर समाधान वाटले. इशा सकर्डे, टाटा पारसी हायस्कूल ---------------आमच्या परिश्रमाचे समाधान वाटतेहे सादरीकरण करण्यासाठी आम्ही सातत्याने तालिम करीत होतो. आम्ही जे परिश्रम घेतले त्याची प्रशंसा झाली त्यामुळे खूप आनंद वाटतो. आमच्या सादरीकरणाने नागपूरचे नाव मोठे झाले, याचा अभिमान वाटतो. सुरेश शर्मा, बॅ. शेषराव वानखेडे हायस्कूल ----------------नागरिकांच्या प्रतिसादाने आनंद आम्ही राजपथावर सादरीकरण करीत असताना नागरिकांनी खूप प्रतिसाद दिला. त्यामुळे आपण दिल्लीत नसून नागपुरात असल्यासारखे वाटले. तेथे सर्वांनीच खूप प्रेम दिले. हा अनुभव खूपच छान होता. मोदींना प्रत्यक्ष पाहून तर आम्हाला खूप आनंद झाला. विशेष म्हणजे मोदींसह ओबामांनाही प्रत्यक्ष पाहता आले. मृण्मयी आडेकर, टाटा पारसी स्कूल