अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजीटल ग्रंथालय

By admin | Published: May 16, 2016 12:44 AM2016-05-16T00:44:09+5:302016-05-16T00:44:09+5:30

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट साकारण्यासाठी आवश्यक असणारी पुरेशी माहिती सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी या उद्देशाने डिजीटल इंडिया या संकल्पनेने प्रेरित होऊन एसएसबीटी महाविद्यालयाने डिजीटल गं्रथालय उभारले आहे.

Digital Library for Engineering students | अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजीटल ग्रंथालय

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजीटल ग्रंथालय

Next
ियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट साकारण्यासाठी आवश्यक असणारी पुरेशी माहिती सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी या उद्देशाने डिजीटल इंडिया या संकल्पनेने प्रेरित होऊन एसएसबीटी महाविद्यालयाने डिजीटल गं्रथालय उभारले आहे.

प्रत्येक विभागासाठी दोन भाग
हे ग्रंथालय महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या सर्व विभागासाठी खुले करण्यात आले आहे. यात मागील तीन वर्षापासून विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापकांनी तयार केलेले प्रोजेक्ट आणि रिसर्च पेपर संग्रहित केले आहेत. डिजीटल लायब्ररीमध्ये माहिती संग्रहित करण्यासाठी दोन सेक्शन आहेत. एका सेक्शनमध्ये विद्यार्थ्यांनी आजपर्यंत तयार केलेले प्रोजेक्ट व दुसर्‍या सेक्शनमध्ये रिसर्च पेपर अपलोड केलेले आहेत.

सुप्रसिद्ध रिसर्च पेपर व प्रोजेक्टचे भांडार
महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आतापर्यंत केलेले सर्व संशोधन पेपर व विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट रिपोर्ट गं्रथालयात संग्रहित केल्याने अधिक प्रोजेक्ट्स व संशोधन पेपर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्याला हवा असलेला संशोधन पेपर काही सेकंदात मिळणार आहे.

अंतर्विषयक प्रोजेक्टसाठी विशेष फायदा
विद्यार्थ्यांना अंतर्विषयक प्रोजेक्टसाठी संबंधीत विषयाच्या रिसर्च पेपरांची गरज असते. याबाबतची समस्या डिजीटल ग्रंथालयाच्या माध्यमातून दूर झाली आहे. याचा फायदा अधिकाधिक समाज उपयोगी प्रोजेक्ट्स बनविण्यासाठी होईल. महाविद्यालयातील कुठल्याही संगणकात विद्यार्थ्यांना मुख्य सर्वरद्वारे डिजीटल ग्रंथालय वापरता येईल.

लायसेन्स फ्री सॉफ्टवेअरचा वापर
डिजीटल ग्रंथालय उभारण्यासाठी महाविद्यालयाने कु ठलेही खर्चिक तंत्रज्ञान वापरले नसून ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असलेल्या फ्री सॉफ्टवेअरचा आधार घेतला आहे. त्यामुळे महाविद्यालयाला कुठलाही खर्च आलेला नाही.
उच्च पदवीधर व पिएचडी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन कार्यासाठी लागणारे सर्व संशोधन पेपर याद्वारे संग्रहित करता येतील.
डिजीटल ग्रंथालयाची संकल्पना महाविद्यालयाचे टेक्निकल डायरेक्टर डॉ. जी.के.पटनाईक व महाविद्यालयाचे ग्रंथपाल सुधीर पाटील यांच्या अथक परिश्रमातून साकार झाली आहे. याबद्दल प्राचार्य डॉ. के.एस.वाणी, डॉ. आर.एच.गुप्ता, शशिकांत कुलकर्णी, शिक्षण संचालक डॉ. संजय शेखावत यांनी कौतुक केले.

Web Title: Digital Library for Engineering students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.