जिल्ह्यात १३९ वाळू भूखंडाचे लिलाव जाहीर
By Admin | Updated: January 19, 2015 23:56 IST2015-01-19T23:56:09+5:302015-01-19T23:56:09+5:30
३१ जानेवारीला होणार ई-लिलाव

जिल्ह्यात १३९ वाळू भूखंडाचे लिलाव जाहीर
३ जानेवारीला होणार ई-लिलावपुणे: दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर पर्यावरण विभागाची परवानगी मिळाल्याने जिल्ातील १३९ वाळू भूखंडाच्या लिलावाला शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे येत्या ३१ जानेवारी रोजी ई-ऑक्शन पध्दतीने हे लिलाव करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले.पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने इंदापूर, शिरुर, दौंड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील ३४० वाळू भूखंड असून, यापैकी १३९ ग्रामपंचायतीने भूखंडाचे लिलावाचे करण्याची परवानगी दिली होते. या भूखंडाच्या लिलावाचे प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे एक महिन्यापासून प्रलबिंत होते.यामुळे जिल्ात वाळू लिलावाचे प्रमाण वाढले होते.आज पर्यावरण विभागाने या भूंखडातून वाळू लिलाव करण्यासाठी परवानगी दिली आहे.वाळू लिलावातील गैरप्रकार, मिलीभगत आणि गुन्हेगारी प्रवृत्तींचा शिरकाव रोखण्यासाठी गेल्या वर्षापासून ई-ऑक्शन पद्धतीने ऑनलाईन लिलाव करण्यात येत आहेत. या वर्षीच्या १३९ भूखंडाचे ३१ जानेवारीला लिलाव होणार आहे. या वाळू लिलावासाठी इच्छुक असणा-याचे ई-ऑक्शनचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुकांना डिजीटल सिग्नेचर आणि पासवर्डच्या सााने लिलावात भाग घेता येईल. त्या दिवसभरात ऑनलाईन बोली सममिट करता येईल. तसेच एका बोलीनंतर पुढील बोलीसाठी दहा हजार रुपये किंवा त्या पटीतच पुढील बोली लावण्याची अट घालण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे लिलावात कोण सहभागी होत आहे, हे इतरांना कळणार नाही. त्यामुळे अनेक गैरप्रकार टळण्यास मदत होणार आहे.वाळू लिलावाच्या अटी व शर्ती अपसेट पाईज व इतर माहिती जिल्हाधकारी कार्यालयातील गौण खनिज शाखा तसेच जिल्ातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे कार्यालयात व हींीिं:// ुुु.शर्रीलींळेपलेश्रर्श्रिीपश.रललिीेलर्शीीश.लेा या संकेतस्थळावर दिली असल्याचे पाटील यांनी सांगितले.