मेहता हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2015 00:24 IST2015-12-27T00:12:10+5:302015-12-27T00:24:05+5:30

नाशिक : साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकरोड संचलित के. जे. मेहता हायस्कूल आणि ई. वाय. फडोळ ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले.

Annual affection in Mehta High School | मेहता हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन

मेहता हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन

नाशिक : साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकरोड संचलित के. जे. मेहता हायस्कूल आणि ई. वाय. फडोळ ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाटक, वादन, क्रीडा आदि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित नारायण नागरे, वसंतराव नगरकर, सुकेणकर, केशवभाई चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष गणपत मुठाळ, सचिव प्रवीण जोशी, खजिनदार मिलिंद पांडे आदिंच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डी. बी. वाक्चौरे यांनी, अहवाल वाचन उपप्राचार्य हेमंत देवनपल्ली तर सूत्रसंचालन माधुरी पेखळे व शीतल सावंत यांनी केले. आर. टी. महाजन यांनी आभार मानले. याप्रसंगी अश्विनी दापोरकर, करुणा आव्हाड, एस. एस. राहिंज, एस. एस. शिंदे आदि उपस्थित होते.

Web Title: Annual affection in Mehta High School