करजगी स्कूलचे स्नेहसंमेलन थाटात
By Admin | Updated: February 19, 2016 00:40 IST2016-02-19T00:40:45+5:302016-02-19T00:40:45+5:30
सोलापूर : बाळे येथे नागेश करजगी किड्स स्कूलचे पहिले वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडल़े यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला़

करजगी स्कूलचे स्नेहसंमेलन थाटात
स लापूर : बाळे येथे नागेश करजगी किड्स स्कूलचे पहिले वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडल़े यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला़ कार्यक्रमास जनकल्याण मल्टिस्टेट सोसायटीचे चेअरमन राजेंद्र हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती़ उमा महिला मंडळाचे संस्थापक राजाभाऊ आलुरे, विकास कस्तुरे, अंजली गुरव, श्वेता कस्तुरे, गणेश माळगे, अरविंद महाले यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती़ यावेळी गुणदर्शन कार्यक्रमाबरोबरच रंगभरण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या़ स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शिक्षिका स्मिता पवार, दीपाली कुलकर्णी, मोहिनी पाटील, रोहित फंड, पवन आलुरे यांनी प्रयत्न केल़े -------------------------फोटो -- 18 करजगी किड्स स्कूल नागेश करजगी किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनप्रसंगी कलागुण सादरीकरण करुन टाळ्यांची दाद मिळवली़