निसाका प्रशासकीय मंडळाने स्वीकारला पदभार
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:26+5:302015-02-10T00:56:26+5:30
भाऊसाहेबनगर : निफाड सहकारी साखर कारखान्यावर प्रादेशिक सहसंचालक यांनी नियुक्त केलेल्या प्रशासकीय मंडळातील प्राधिकृत अधिकार्यांनी अखेर रविवारी पदभार स्वीकारला आहे.

निसाका प्रशासकीय मंडळाने स्वीकारला पदभार
भ ऊसाहेबनगर : निफाड सहकारी साखर कारखान्यावर प्रादेशिक सहसंचालक यांनी नियुक्त केलेल्या प्रशासकीय मंडळातील प्राधिकृत अधिकार्यांनी अखेर रविवारी पदभार स्वीकारला आहे.निसाका मुख्यालयात नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय मंडळातील शासकीय सदस्य जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष देसले, निफाड तालुका उपनिबंधक महेश भडांगे यांच्यासह भागवत बाबा बोरस्ते, सुकदेव चौरे, सतीश मोरे, पूजा हरी काळे, संजय गामणे, कचरू राजोळे, सिंधूबाई खरात, लिलावती तासकर आदिंनी पदभार स्वीकारून कारखान्याची सूत्रे ताब्यात घेतली.यापूर्वी प्रादेशिक सहसंचालकांनी शासकीय स्तरावरून निफाड सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष देसले व तालुका उपनिबंधक महेश भडांगे आदिंची नियुक्ती केली होती. परंतु सदरच्या आदेशाला निसाकाचे तत्कालिन अध्यक्ष भागवत बोरस्ते यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली होती. त्यानंतर शासकीय स्तरावरून वरील तीन शासकीय अधिकार्यांसह आठ कारखाना सभासद मिळून अकरा सदस्यांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली. शासकीय अधिकारी न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशामुळे पदभार स्वीकारण्यास असमर्थता दर्शवित होते. बोरस्ते यांनी सदरची याचिका मागे घेतली होती. अखेर रविवारी सर्वच प्राधिकृत अधिकार्यांनी पदभार स्वीकारला आहे.यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक भागवत भंडारे, शेतकी अधिकारी अनिल पाटील, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप मोगल, सरचिटणीस संपतराव कडलग संघटना प्रतिनिधी कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.रास्ता रोकोबाबत आज निर्णयकारखान्याच्या प्रशासकीय मंडळातील शासकीय प्रतिनिधींची पदभार स्वीकारण्यासंबंधीची असमर्थता, कारखाना सहभागी तत्वावर चालविण्यास देणे, कामगारांचे २८ महिन्यांपासून थकलेले वेतन, कामगार वसाहतीत गेली २0 दिवसांपासून खंडित झालेला वीज व पाणीपुरवठा तसेच कारखाना गत दोन हंगामापासून बंद असल्याने ऊस उत्पादकांची झालेली वाईट अवस्था आदि कारणास्तव कामगारांचे वतीने मंगळवार दि. १0 रोजी निफाड सहकारी कारखान्याचे कामगार कुटुंबियांची कोकणगाव फाटा येथे रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे.कोटप्रशासकीय मंडळातील शासकीय अधिकार्यांसह इतर प्राधिकृत अधिकार्यांनी पदभार स्वीकारला असला तरी रास्ता रोको करायचा किंवा नाही याबाबतचा निर्णय आज दि. ९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कामगारांच्या द्वारसभेतच घेण्यात येईल.संपतराव कडलगसरचिटणीस निफाड साखर कामगार सभा