शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ज्या आधारे तिकिटे कापली तो सर्व्हे झालाच नाही; छत्तीसगडमधील काँग्रेसचे १२ माजी आमदार नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 07:48 IST

राज्यात तिकीट वाटपात भूपेश बघेल यांनी आपल्या २२ आमदारांचे तिकीट कापले होते. हे आमदार निवडणुकीत पराभूत होणार असल्याच्या सर्व्हेच्या अहवालाच्या आधारावर ही तिकिटे कापण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. 

- आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये काँग्रेस एकीकडे विधानसभा निवडणुकीमधील पराभवाची कारणे शोधत असताना पक्षांतर्गत असंतोष बाहेर येत आहे. राज्यातील १२ माजी आमदारांनी दिल्लीत जाऊन संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. यात प्रभारी कुमारी शैलजा, माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि माजी उपमुख्यमंत्री टी.एस. सिंह देव यांचा समावेश आहे. 

यावेळी माजी आमदारांनी सांगितले की, सर्व्हेच्या आधारावर आमची तिकिटे कापली होती; परंतु, संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून तर छत्तीसगडमध्ये कोणताही सर्व्हे करण्यात आला नव्हता. तथापि, राज्यात तिकीट वाटपात भूपेश बघेल यांनी आपल्या २२ आमदारांचे तिकीट कापले होते. हे आमदार निवडणुकीत पराभूत होणार असल्याच्या सर्व्हेच्या अहवालाच्या आधारावर ही तिकिटे कापण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. 

आता संपूर्ण पक्षच छत्तीसगड निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर या माजी आमदारांनी दिल्लीच्या नेतृत्वासमोर आपले म्हणणे मांडले. संघटन सरचिटणीसांची भेट घेतल्यानंतर आता या माजी आमदारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीसाठी वेळ मागितला आहे.

टॅग्स :chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेस