छत्तीसगडमधील बिलासपूर येथे एक मोठी रेल्वे दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. एका मेमू ट्रेनने मालगाडीला मागून धडक दिली, यात मोठी जिवितहानी झाली असून अनेक लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून एक व्यक्ती डब्यात अडकल्याची माहिती समोर आली. त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी संजीव शुक्ला यांनी दिली.
संजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेमू ट्रेनच्या इंजिनचा डबा मालगाडीला मागून धडकला. या अपघातात काही लोक जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या एक व्यक्ती डब्यात अडकली आहे आणि त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. मात्र, सध्या मृतांची नेमकी संख्या स्पष्ट नाही. बचाव कार्य पूर्ण झाल्यावर याबद्दल अधिकृत माहिती दिली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडला.अपघाताची माहिती मिळताच, आग्नेय मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश आणि बिलासपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजमल खोईवाल घटनास्थळी पोहोचले. बिलासपूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदतीची घोषणा केली. तर, जखमींना १ लाख रुपये दिले जातील.
रेल्वेची हेल्पलाइन
या अपघातानंतर रेल्वेने प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाइन नंबर जारी केले. त्यानुसार, 7777857335 आणि 786995330 (बिलासपूर स्टेशन), 808595652 (चांपा जंक्शन), 975248560 (रायडगड) आणि 8294730162 (पेंड्रा रोड) तसेच दुर्घटनास्थळी तात्काळ मदतीसाठी 9752485499 आणि 8602007202 हे दोन विशेष क्रमांक उपलब्ध आहेत.
Web Summary : A train accident in Bilaspur, Chhattisgarh, involved a MEMU train colliding with a goods train. Many are injured, and one person is trapped. Rescue operations are ongoing. Authorities have announced compensation for the deceased and injured. Five deaths have been confirmed.
Web Summary : छत्तीसगढ़ के बिलासपुर में एक मेमू ट्रेन मालगाड़ी से टकरा गई। कई घायल हैं, और एक व्यक्ति फंसा हुआ है। बचाव अभियान जारी है। अधिकारियों ने मृतकों और घायलों के लिए मुआवजे की घोषणा की है। पांच लोगों की मौत की पुष्टि हुई है।