शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतो, कारण..., राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 11:38 IST

भाजप आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतो कारण आदिवासींनी मोठी आणि प्रगतीची स्वप्ने पाहावीत, असे त्यांना वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली.

अंबिकापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी भाजपवर आदिवासींचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप केला. भाजप आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतो कारण आदिवासींनी मोठी आणि प्रगतीची स्वप्ने पाहावीत, असे त्यांना वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली.छत्तीसगडच्या अंबिकापूर मतदारसंघातील एका सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधानांवर हल्ला चढवत म्हटले की, ते स्वत:ला इतर मागासवर्गीय (ओबीसी) व्यक्ती म्हणवतात, पण जेव्हा मागासवर्गीयांना पाठिंबा देण्याची वेळ येते तेव्हा ओबीसी ही जात नाही, असे ते म्हणतात.राहुल गांधी म्हणाले की, भाजपच्या एका नेत्याने आदिवासी तरुणावर लघवी केल्याचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाच असेल. ते जनावरांवर लघवी करत नाहीत, मात्र आदिवासींसोबत असे प्रकार करतात. ही भाजपची मानसिकता आहे. वनवासी म्हणजे जंगलात राहणारे. भाजप तुम्हाला वनवासी म्हणतो, आम्ही आदिवासी म्हणतो. भाजप तुमचे हक्क हिसकावून घेते.

शिकू नका, का म्हणतात?- येत्या १५-२० वर्षात जंगले नाहीशी झाली तर वनवासी कुठे जाणार? ते (भाजप) तुम्हाला (आदिवासींना) म्हणतात की, इंग्रजी शिकू नका, कारण तुम्ही मोठी स्वप्ने पाहू नयेत किंवा ती पूर्ण होऊ नयेत, अशी त्यांची इच्छा आहे. पंतप्रधान प्रत्येक भाषणात स्वत:ला ओबीसी म्हणवून घेतात आणि ओबीसींच्या कल्याणाविषयी बोलतात. जातीची जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही केली तेव्हा ते म्हणाले की, एकच जात आहे आणि ती म्हणजे ‘गरीब’. मग तुम्ही स्वतःला ओबीसी का म्हणता? एकच जात असेल तर तो श्रीमंत कोण, असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.

साहेबांनी आज सकाळीच सांगितले. सकाळी लवकर, माझ्या नामांकनाच्या वेळी माझ्यासोबत उपस्थित असलेल्या सुरेश धिंगाणी यांच्या घरी ईडी पाठविली आहे. साहेब, छत्तीसगडियांना दुर्बल आणि भित्रा समजू नका. ते त्यांचा भात खातात तेही पूर्ण स्वाभिमानाने.   छत्तीसगडियांच्या स्वाभिमानाची ही गोष्ट आहे.- भूपेश बघेल, मुख्यमंत्री, छत्तीसगड

टॅग्स :chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस