शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

जिल्हा परिषद शाळेने करून दाखवल; मलकापूर इथे भरते चिमुकल्यांची दप्तरमुक्त शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 19:46 IST

मलकापूर शाळेचा स्तुत्य उपक्रम 

ठळक मुद्देहोय... इथे भरते जिल्हा परिषदेची दप्तरमुक्त शाळा भाजीपाला पिकवतात विद्यार्थी इंग्रजी सुधारण्यासाठी ‘अवर वर्ड बँक’चा प्रयोग

- राम शिनगारे  

औरंगाबाद : राज्यभरात शालेय मुलांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न सतत चर्चेत असतो. मात्र, औरंगाबाद तालुक्यातील मलकापूर येथील जि.प. शाळेत प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरविण्यात येते. यादिवशी विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम घेण्यात येतात. याशिवाय शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इंग्रजी शब्दसंचय, भाजीपाला पिकवणे, खेळ, चित्रकला, वस्तुकला, वाचनात पारंगत करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येतात, अशी माहिती उपक्रमशील शिक्षिका संगीता तळेगावकर यांनी दिली.

मलकापूर हे औरंगाबाद तालुक्यातील छोटे गाव आहे. या गावाची लोकसंख्या अवघी ३३९ आहे. या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेत २० विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षिका कार्यरत आहेत. या शाळेचा चेहरामोहराच या शिक्षिकांनी बदलला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील उपक्रमशील शाळांमध्ये मलकापूरच्या शाळेचा समावेश होतो. मागील वर्षभरापासून शाळेत इंग्रजी सुधारण्यासाठी ‘अवर वर्ड बँक’चा प्रयोग राबविला जात आहे. या प्रयोगात विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी पाच इंग्रजी शब्द पाठांतरासाठी दिले जातात. घरी गेल्यानंतर विद्यार्थ्यांना हे शब्द पाठ करावे लागतात. दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना चिठ्ठ्या दिल्या जातात. या चिठ्ठ्यांवर विद्यार्थी पाठ केलेले शब्द लिहितात. चिठ्ठीच्या पाठीमागून स्वत:चे नाव लिहिले जाते. 

या चिठ्ठ्या  एका बॉक्समध्ये साठविल्या जातात. महिन्याच्या शेवटी या सर्व चिठ्ठ्यांचा, पाठ केलेल्या शब्दांचा आढावा घेतला जातो. त्यातून विद्यार्थी इंग्रजी भाषेविषयी अपडेट राहतात, असेही शिक्षिका संगीता तळेगावकर सांगतात. हा उपक्रम सातारा येथील शाळेत २०११ पासून राबविण्यात येत होता. मागील वर्षी संगीता तळेगावकर यांची मलकापूर शाळेत बदली झाली. त्याठिकाणीही हा उपक्रम सुरू केला. 

शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्रा कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरविण्यात येते. यादिवशी विद्यार्थ्यांना वाचन उपक्रम, आर्ट आणि क्राफ्टच्या वस्तू बनविण्यास शिकवले जाते. याशिवाय इतरही उपक्रम घेतले जातात. शाळेच्या परिसरात शालेय पोषण आहारासाठी लागणाºया भाजीपाल्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने परसबाग निर्माण केली आहे. यात  टोमॅटो, वांग्यांसह इतर भाजीपाला लावण्यात आला आहे. यातून विद्यार्थ्यांना सकस दर्जाचा आहार मिळण्यासही मदत होत आहे. शाळेच्या प्रगतीविषयी गावकºयांमध्ये समाधान आणि आनंद व्यक्त करण्यात येत असल्याचे तळेगावकर यांनी सांगितले.

बीटस्तरीय कला, क्रीडा महोत्सवात यशमलकापूर शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी बीटस्तरीय ४५ शाळांच्या कला क्रीडा महोत्सवात उल्लेखनीय सहभाग नोंदवला. यात वक्तृत्व, निबंध, समूहगीत स्पर्धेत पारितोषिक पटकावले. कबड्डी आणि लेझीम स्पर्धेत विद्यार्थी संख्या कमी पडत असल्यामुळे वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेत सहभाग नोंदवला. यातही उत्कृष्ट सादरीकरण करीत सर्वांची मने जिंकली असल्याचे शाळेच्या शिक्षिकांनी सांगितले. या शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांची मदत मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादTeacherशिक्षक