शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

रेल्वेने तहान भागविलेल्या लातुरात यंदा शून्य टँकर

By admin | Updated: May 12, 2017 23:41 IST

लातूर : यंदा मात्र जिल्ह्यात एकही टँकर नाही की, कोण्या गावात टंचाईच्या झळा नाहीत.

हणमंत गायकवाड । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : गतवर्षी लातूर शहर व जिल्ह्यात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्याने रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली होती. शिवाय, जिल्हाभरात सरकारी यंत्रणेसह सामाजिक संस्था, संघटनांच्या जवळपास १३०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा मात्र जिल्ह्यात एकही टँकर नाही की, कोण्या गावात टंचाईच्या झळा नाहीत. जलसंधारणाच्या कामाचा चांगला इफेक्ट झाला असून, दोन मोठ्या प्रकल्पांसह मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. जे की, गतवर्षी उन्हाळ्यात कोरडेठाक होते. गतवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात अभूतपूर्व पाणीटंचाईने लातूरकर हैराण झाले होते. मांजरा प्रकल्पासह जिल्ह्यातील पाण्याचे सर्व स्त्रोत आटले होते. डोंगरगाव, माकणी, धनेगाव बॅरेजेस या दोन-तीन स्त्रोतांत थोडेबहुत पाणी होते. अन्य स्त्रोत पूर्णत: कोरडे पडले होते. यामुळे लातूरला मिरजेहून रेल्वेने पाणी आणावे लागले. शिवाय, टँकरद्वारेही पाण्याचे संकलन व वितरण करावे लागले. शहरात मनपाचे ७० तर विलासराव देशमुख फाऊंडेशनचे ७०, शिवसेना, व्हीएस पँथर, अष्टविनायक प्रतिष्ठान, दयानंद शिक्षण संस्था, तय्यबा चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र विकास आघाडी, मनसे, महिंद्रा कोटक बँक, मारवाडी शिक्षण संस्था आदी संस्था-संघटनांचे मिळून ४६६ टँकर शहरात मोफत पाणीपुरवठा करीत होते. तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे ३५७ व विविध संस्थांचे १९२ असे एकूण शहर व जिल्ह्यात १३०० टँकरचा मोफत पाणीपुरवठा होता. यंदा मात्र मुबलक पाणीसाठा असल्याने एकही टँकर नाही. यंदा पिण्यासाठी तर सोडाच; घरगुती वापरासाठीही पाणी विकत घेण्याची गरज नाही. या पाणीटंचाईमुळे जलसाक्षरता वाढली असून, शहरात बहुतांश बोअरचे पुनर्भरण करण्यात आले असून, छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची योजना यशस्वी राबविली आहे. त्यामुळे यंदाच्या तीव्र उन्हाळ्यातही पाणीपातळीत समतोल आहे. शहरात मनपाच्या मालकीचे ६०० बोअर असून, यंदाच्या उन्हाळ्यात एकही बोअर बंद पडल्याचे ऐकिवात नाही.