शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईचा यावर्षी फटाकेमुक्त दिवाळीचा निर्धार; पाडव्याला करणार वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 16:03 IST

कोरोना आणि फटाक्यांमुळे पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम यामुळे लोकांमध्ये जागरूकता

ठळक मुद्देयंदा कोरोनामुळे लोकांमध्ये फटाक्यांची धास्ती दिसून येत आहे.

औरंगाबाद : दिवाळी म्हणजे फटाक्यांचा आवाज आणि विद्युत रोषणाई. जेवढा मोठा आवाज  करणारा फटाका,  तेवढी त्याची मागणी जास्त, अशी एक धारणा झाली आहे; पण कोरोना आणि फटाक्यांमुळे पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम यामुळे लोकांमध्ये जागरूकता आली असून, अनेक जण फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यास उत्सुक आहेत. 

यंदा कोरोनामुळे लोकांमध्ये फटाक्यांची धास्ती दिसून येत आहे. मुंबईसह अनेक महानगरपालिकांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यंदा फटाके फोडून नाही, तर दिव्यांची आरास लावून दिवाळी साजरी करण्याचे अनेकांनी ठरविले आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात तरुणाईनेही पुढाकार घेतला असून, मोठ्या आवाजातील फटाक्यांची क्रेझ कमी झाल्याचे दिसत आहे. फटाक्यांचा धूर सर्वसामान्यांसाठीही हानिकारक असतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यात यावर्षी कोरोनाची भीती असल्याने फटाक्याच्या धुरापासून कोरोना रुग्णांना, तसेच कोरोेनातून बऱ्या झालेल्या नागरिकांनाही त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो कोणतेच फटाके न फोडण्याचे आवाहन डॉक्टरही करीत आहेत.

फटाक्यांची दुकाने रिकामीचदरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या दुकानात दिसणारी गर्दी खूपच कमी आहे. अगदी दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन असतानाही शुक्रवारी फटाक्यांच्या दुकानांत अगदीच कमी लोक दिसून आले. त्यामुळे फटाके विक्रेतेही काही प्रमाणात नाराज दिसून आले. जे लोक खरेदीसाठी येत आहेत, तेही मोठ्या आवाजातील फटाके घेण्याचे टाळून भुईचक्र, अनार असे रोषणाई करणारे फटाके घेण्यास प्राधान्य देत आहेत. दरवर्षी हजार रुपयांचे फटाके घेणारे यंदा ५०० ते ६०० रुपयांत खरेदी आटोपती घेत आहेत, असे काही फटाके विक्रेत्यांनी सांगितले.

फटाके फोडण्याऐवजी वृक्षारोपणावर भरदरवर्षीच आम्ही फटाके वाजविणे टाळतो; पण यंदा मात्र वी फॉर एन्व्हायर्नमेंटच्या सगळ्या सदस्यांनीच फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला आहे. यावर्षी आमच्या ग्रुपचा एकही सदस्य एकही फटाका फोडणार नाही. उलट दिवाळीच्या पाडव्याचा मुहूर्त साधून आम्ही ग्रुपचे सर्व सदस्य वेगवेगळ्या भागांत वृक्षारोपण करणार आहोत.- मेघना बडजाते, वुई फाॅर एन्व्हायर्नमेंट

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद