शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा उमेदवारीवरून सोशल मीडियातील पोस्टमुळे युवानेत्याचे भाजपाने काढले पद

By विकास राऊत | Updated: March 11, 2024 13:01 IST

लोकसभा उमेदवारीवरून केले होते वक्तव्य, प्रदेशाध्यक्षांकडून स्थगिती दिली पदाला

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून भाजपत अंतर्गत राजकारण पेटले असून त्याचा पहिला बळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कुणाल मराठे यांचा गेला आहे. भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांकडून मराठे यांच्या सचिवपदाला स्थगिती देण्यात आली आहे.

भाजप पदाधिकारी असताना मतदारसंघातून उमेदवार कोण व कसा असावा, आणि खासदार कोण व्हावे, यासाठी सोशल मीडियात जारी केलेल्या व्हिडीओमधून  भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कुणाल मराठे यांनी वक्तव्य केले. तसेच, बाजारात इतर बंद पडलेल्या कॅसेट्स फिरत आहेत. जनतेने भूलथापांना बळी पडू नये, युवा, तरुण उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन मराठे यांनी व्हिडीओतून केले. बंद पडलेल्या कॅसेट्स हे वक्तव्य भाजपतील काही नेत्यांना प्रचंड लागले. त्यामुळे या व्हिडीओची युवा मोर्चा प्रदेश पातळीवर गांभीर्याने दखल घेतली गेली. मराठे यांच्या सचिवपदाला स्थगिती देण्यात आलेले पत्र युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी जारी केले. ते पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले.

दरम्यान, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांना विचारले असता ते म्हणाले, सोशल मीडियात व्हायरल झालेले पत्र खरे आहे. मराठे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी पक्षाबाबत व्हिडीओमध्ये काहीही वक्तव्य केलेले नाही. माझ्या पदाला स्थगिती दिल्याबाबत मला काहीही सूचना मिळालेल्या नाहीत.

लोणीकरांच्या पत्रात काय आहे?भाजयुमोने आपणास दिलेल्या प्रदेश सचिव पदाला काही कारणास्तव तत्काळ स्थगिती देण्यात येत आहे. दिलेली स्थगिती या क्षणापासून तत्काळ लागू होत आहे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी मराठे यांच्या नावे दिलेले या आशयाचे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले. दरम्यान, लोणीकर यांच्याशी संपर्क केला असता ते ऑनलाइन बैठकीत असल्यामुळे उपलब्ध होऊ शकले नाहीत.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबाद