शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून युवकाने मागितला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 19:15 IST

भूसंपादन प्रक्रियेनुसार कारवाई करण्याची मागणी

ठळक मुद्दे औरंगाबाद मनपाचा केला निषेध  

औरंगाबाद : जयभवानीनगर येथील गणेश सूर्यवंशी या युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रक्ताने पत्र लिहून न्याय मागितला आहे. गल्ली नं.१५ मध्ये राहणाऱ्या सूर्यवंशीने ई-मेलद्वारे रक्ताने लिहिलेल्या पत्राची प्रत स्कॅन करून पाठविली आहे. त्यात त्याने म्हटले आहे. गरिबांना न्याय मिळाला पाहिजे. गरिबांना कधी न्याय मिळणार, राजकारणी लोक किड्या-मुंग्यांप्रमाणे पायाखाली सामान्य नागरिकांना चिरडत आहेत. यासाठी मुख्यमंत्री काय करणार, याचे उत्तर मिळाले पाहिजे. 

शिवाजीनगर ते रामनगरपर्यंत होणाऱ्या रस्तारुंदीकरण मोहिमेत २०० हून अधिक घरे जात आहेत. महापालिका यासाठी भूसंपादन करीत असल्याचे सूर्यवंशी याचे म्हणणे आहे. मागील दोन दशकांपासून नागरिक या परिसरात राहत आहेत. त्यांनी बॉण्डवर प्लॉट खरेदी केले आहेत. नागरिकांना कोणतीही सूचना न देता महापालिकेने रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. रस्ता रुंदीकरण करण्यासाठी नागरिकांचा कोणताही विरोध नाही; परंतु पालिकेने भूसंपादन प्रक्रियेनुसार कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांसह महापालिका आयुक्तांनादेखील सूर्यवंशी याने पत्र पाठविले आहे. दरम्यान, सूर्यवंशी याच्याशी संपर्क केला असता तो म्हणाला, मी खरच रक्ताने पत्र लिहून त्याचे स्कॅन करून मुख्यमंत्र्यांना ई-मेल केले आहे. सामान्यांचा आवाज महापालिका ऐकत नाही, त्यामुळे या मार्गाने जावे लागले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाUddhav Thackerayउद्धव ठाकरे