शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

"हल्ला करणारे तुमचेच माजी नगरसेवक, तेच आज गुंड झाले का?" सावेंचा जलील यांना बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 19:28 IST

इम्तियाज जलील यांनी हल्ल्याबाबत आरोप केल्यानंतर मंत्री अतुल सावे यांचा पलटवार

छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या रॅलीत झालेल्या राड्याचे पडसाद शहरात उमटत आहेत. जलील यांनी हा हल्ला पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्या गुंडांनी केल्याचा आरोप केल्यानंतर, कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी यावर अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. "हल्ला करणारे दुसरे तिसरे कोणी नसून एमआयएमचेच पदाधिकारी आणि माजी नगरसेवक आहेत," असा खळबळजनक खुलासा सावे यांनी केला आहे.

तुमच्याच 'गुंडां'ना तुम्ही तिकीट का दिले? अतुल सावे म्हणाले की, "जलील ज्यांना गुंड म्हणत आहेत, त्यांनाच त्यांनी मागच्या वेळी तिकीट देऊन नगरसेवक बनवले होते. जर ते गुंड आहेत तर तुम्ही त्यांना संधी का दिली? मुळात जलील यांनी आर्थिक व्यवहार करून तिकिटे वाटली, असा त्यांच्याच कार्यकर्त्यांचा संताप आहे. ज्या प्रभागात ही घटना घडली, तिथे आमचा कोणताही संबंध नाही आणि आम्ही तिथे निवडणूकही लढत नाही. त्यामुळे आम्ही हल्ला करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."

सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोर येईल इम्तियाज जलील यांनी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिले असल्याचे सांगितले आहे. त्यावर बोलताना सावे म्हणाले की, "हो, पोलिसांनी कारवाई करावी आणि आरोपींना अटक करावी. त्यात सत्य बाहेर येईल." मनपा निवडणूक प्रचार शिगेला पोहचलेला असताना बायजीपूरा परिसरातील घटनेने आता शहराच्या राजकारणाने नवे वळण घेतले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-corporators, your own, attacked rally, now labeled goons?

Web Summary : Minister Save vehemently denies involvement in rally attack, accusing Jaleel's own ex-corporators. Save questions Jaleel's past ticket distribution to alleged 'goons,' demanding CCTV evidence reveal the truth, as election tensions escalate.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Atul Saveअतुल सावे