शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

तरुणास गाडीत टाकताना अपहरणकर्त्यांचा मोबाइल खाली पडला अन् पोलिसांनी डाव उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:09 IST

पोलिस आयुक्तांपासून सर्व वरिष्ठांची धावाधाव; विशेष म्हणजे, अपहरण झालेल्या तरुणाने तक्रार देण्यास नकार देत अपहरण केलेल्या तरुणांसोबत तडजोड केली.

छत्रपती संभाजीनगर : पैशांच्या वादातून एका तरुणाचे सिटीचौक परिसरातून भर दिवसा अपहरण करण्यात आले. या झटापटीत अपहरणकर्त्यांचा घटनास्थळी पडलेला मोबाइल पोलिसांच्या हाती लागला आणि अपहरणाचा डाव उधळला. या अपहरण नाट्यामुळे मात्र पोलिस आयुक्तांपासून सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांची तब्बल सहा तास धावपळ उडाली. गुरुवारी दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा नाट्यमय प्रकार घडला.

पश्चिम बंगालचा असलेल्या अंदाजे ३० वर्षीय तरुण सराफा कारागीर आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याने पाचोड परिसरातील तरुणांसोबत सोने खरेदी विक्रीतून ७ लाख रुपयांचा व्यवहार केला होता. त्या व्यवहारातून त्यांच्यात वाद झाले आणि सदर तरुणाने पाचोडच्या तरुणांसोबतचा संपर्क बंद केला. तेव्हापासून पाचोडचे तरुण त्याच्या शोधात होते. गुरुवारी दुपारी १ वाजता सिटीचौकातील रोहिलागल्ली परिसरात त्याचा पाठलाग करून त्याला बळजबरीने कारमध्ये बसवून ते पसार झाले. भर रस्त्यावर आरडाओरड, धक्काबुक्की करून तरुणाचे अपहरण झाल्याने सगळेच आवाक् झाले आणि तरुणाच्या अपहरणाची वार्ता वाऱ्यासारखी पसरली.

मोबाइल पडला अन्...या धक्काबुक्कीत ऋषिकेश नामक तरुणाचा मोबाइल घटनास्थळीच पडला. नागरिकांनी मोबाइलसह सिटीचौक पोलिस ठाणे गाठले. निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक अजित दगडखैर यांना सर्व प्रकार सांगितला. पासवर्डमुळे पोलिसांना तो अनलॉक करता आला नाही. काही मिनिटांत त्यावर कॉल आला आणि नेमका अधिकाऱ्यांनी रिसिव्ह केला. पोलिसांकडे आपला मोबाइल मिळाल्याचे कळताच सर्व मोबाइल बंद झाले आणि काही मिनिटांत अपहरण केलेल्या तरुणाला अचानक रस्त्यातच सोडून त्यांनी पळ काढला.

आयुक्तांपासून सगळ्यांची धावाधावपोलिसांना प्रथमदर्शनी मोबाइल ऋषिकेशचा असून त्याचेच अपहरण झाल्याचे जाणवले. ऋषिकेशच्या कुटुंबालाही संपर्क केला गेला. मात्र, त्यांनाही प्रतिसाद न दिल्याने गोंधळ आणखी वाढला. दुसरीकडे या घटनेमुळे पोलिस हादरून गेले होते. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त संपत शिंदे सर्वच घटनास्थळी दाखल झाले. सिटीचौक पाेलिस, गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी फुटेज तपासून पैठण मार्गावरही लागले. तोपर्यंत पाचोड पोलिस सदर तरुणांच्या घरी पोहोचले अणि सायंकाळी ऋषिकेशच अपहरणाच्या कटात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अपहरण झालेला तरुणही पाचोड ठाण्यात पोहोचला होता.

तक्रार देण्यास नकारअपहरण झालेल्या तरुणाने रात्री तक्रार देण्यास नकार देत अपहरण केलेल्या तरुणांसोबत तडजोड केली. सिटीचौक पोलिसांनी सर्वांना शुक्रवारी अधिक चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण