शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीने भेटण्यास नकार दिल्याने तरूणाने अपार्टमेंटवरुन उडी मारून संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 20:00 IST

तरुणाने तिला भेटण्यासाठी बोलावून तू माझ्यासोबत चल असा आग्रह केला.

ठळक मुद्देठाणे येथून आला होता विवाहित प्रेयसीला भेटायलाविवाहितेने निघून जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने संतापात उडी घेतली

औरंगाबाद: विवाहित प्रेयसीने भेटायला आणि त्याच्यासोबत घराबाहेर पडण्यास नकार दिल्याने त्याने आरडाओरड करीत अपार्टमेंटच्या छतावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ईटखेडा येेथे बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास झाली. याप्रकरणी सातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तुषार संजय गायकवाड(३२,रा.ठाणे )असे मृताचे नाव आहे. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, तुषार हा मुंबई महापालिकेत नोकरी करीत होता. त्याच्या ठाणे शहरातील तरूणीसोबत त्याचे प्रेम होते. तिच्या घरातील मंडळीना त्यांचे प्रेम मान्य नसल्याने त्यांनी तिचे लग्न औरंगाबादेतील एका तरूणासेाबत लावून दिले. लग्नानंतर तरूणीला दोन अपत्य झाली. ती पतीसोबत ईटखेडा परिसरात राहते. मात्र तुषारचे तिच्यावर प्रेम असल्याने त्याने लग्न केले नाही. तो तिला भेटण्यासाठी अधूनमधून औरंगाबादेत यायचा. काल बुधवारी तो येथे आला आणि त्याने तिला भेटण्यासाठी बोलावले. तू माझ्यासोबत चल असे तो तिला म्हणत होता. पती घरी असल्याने तिने त्यास भेटण्यास नकार दिला. शिवाय येथून निघून जा,असे ती वारंवार त्यास सांगत होती. याचा राग आल्याने तो तिच्या अपार्टमेंटमध्ये गेला. तेथे त्याने आरडाओरड करून तिला पुन्हा घराबाहेर येण्यास सांगितले. यानंतरही तिने नकार देताच तुषार अपार्टमेंटच्या छतावर गेला आणि त्याने तेथून थेट खाली उडी मारली. या घटनेत तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्या बेशुद्ध पडला. या घटनेची माहिती रहिवाश्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कळविली. सातारा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तुषारला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी तुषारला तपासून रात्री १०.५० वाजता मृत घोषित केले. पोलीस हवालदार युवराज हिवराळे तपास करीत आहेत.

मृतदेह दिवसभर घाटीतील शवागृहातडॉक्टरांनी तुषारला तपासून मृत घोषित केल्यानंतर पोलिसांनी त्याचे प्रेत घाटीतील शवागृहात ठेवले. आणि त्याच्या नातेवाईकांशी संपर्क करून या घटनेची माहिती त्यांना कळविली. त्याचे नातेवाईक ठाणे येथून निघाले होते. गुरूवारी सायंकाळपर्यंत घाटीत पोहचले नव्हते. त्यांच्या उपस्थितीत त्याचा शवविछेदनपूर्व पंचनामा केले जाईल.यानंतर शवविछेदन झाल्यावर प्रेत त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद