शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावताच तरुणाने पाठलाग करून आरोपीस पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 7:24 PM

वडिलांची औषधी आणण्यासाठी जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या मोपेडस्वार तीन चोरट्यांपैकी एकाला सिनेस्टाईल पाठलाग करून तरुणाने पकडले.

औरंगाबाद : वडिलांची औषधी आणण्यासाठी जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या मोपेडस्वार तीन चोरट्यांपैकी एकाला सिनेस्टाईल पाठलाग करून तरुणाने पकडले. यावेळी तरुणासोबत झटापट करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. ही थरारक घटना शुक्रवारी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास एमजीएम रुग्णालयाजवळ घडली.

रोहित अनिल बेहडे (१८, रा. एन-७ सिडको) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  बेगमपुरा भागातील प्रगती कॉलनी येथील सैफ अली खानचे वडील काही दिवसांपासून आजारी आहेत. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सैफ अली खान आणि त्याच्या अन्य नातेवाईकांनी रुग्णाला एमजीएममध्ये दाखल केले होते. 

तेथील डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधीची चिठ्ठी घेऊन तो औषधी आणण्यासाठी रुग्णालयाच्या बाहेरील औषधी दुकानाकडे मोबाईलवर बोलत जात होता. त्याचवेळी मागून आलेल्या मोपेडस्वार तीन चोरट्यांपैकी एकाने सैफच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि ते सुसाट जाऊ लागले.  यावेळी प्रसंगावधान राखून सैफने चोर-चोर म्हणून ओरडाओरड करीत चोरट्यांचा पळत पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्याने मोपेडवर सर्वात मागे बसलेल्या एकाला पक डल्याने तो मोपडेवरून खाली पडला. त्यावेळी त्याचे साथीदार न थांबता त्याला सोडून सुसाट निघून गेले. यावेळी चोरटा सैफसोबत झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला असता नागरिक मदतीला धावले आणि  त्यांनी चोरट्याला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती सिडको पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

उपविभागीय अधिकारी आमले यांनी केली मदतऔरंगाबाद ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आमले हे त्याचवेळी त्यांच्या शासकीय वाहनातून कार्यालयात जात होते. यावेळी त्यांनी हद्दीचा विचार न करता गर्दी पाहून त्यांचे वाहन थांबविले. यावेळी त्यांनी प्रथम जमावाच्या तावडीतून चोरट्याला ताब्यात घेऊन त्यांच्या वाहनात बसविले. त्यानंतर ते आरोपीला सिडको ठाण्यात घेऊन गेले. काही वेळानंतर घटनास्थळी सिडको पोलिसांनी धाव घेतली. सैफ आणि त्याच्या नातेवाईकांनी सिडको ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार नोंदविली. सैफ याचा १३ हजाराचा मोबाईल चोरून नेण्यात आला. 

टॅग्स :Mobileमोबाइलtheftचोरीmgm campusएमजीएम परिसरAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस