शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षी सिन्हाच्या व्हिडीओवर अश्लील कमेंट्स करणाऱ्या तरुणाला औरंगाबादेतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 18:49 IST

तांत्रिक पुराव्याच्या आधारे, तो औरंगाबाद शहरातील असल्याचे  समोर आले .

ठळक मुद्देआरोपीने चूक मान्य केलीपोलीस कारवाईवर सोनाक्षीने समाधान व्यक्त केले

औरंगाबाद : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने महिलांच्या सुरक्षे संबंधित शेअर केलेल्या व्हिडीओवर अश्लील कमेंट्स करणाऱ्या तरूणाला मुंबई पोलिसांनीऔरंगाबादेतून  शुक्रवारी अटक  केली. शशिकांत जाधव असे आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोनाक्षीच्या तक्रारीनुसार, ७ ऑगस्ट रोजी तिने इंस्टाग्रामवर महिला सुरक्षेसंबंधित जनजागृतीपर व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर जाधवने अभिनेत्री बाबत अश्लील टिका टिप्पणी केली. ही बाब लक्षात येताच सोनाक्षीने मुंबईत सायबर पोलिसांकड़े तक्रार दिली. त्यानुसार, सायबर पोलीस ठाण्याचे  पोलीस निरिक्षक प्रमोद खोपीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल गायकवाड़ यांनी तपास सुरु केला. 

तांत्रिक पुराव्याच्या आधारे, तो औरंगाबाद शहरातील असल्याचे  समोर आले . यानंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने औरंगाबाद शहरात येऊन तुळजाईनगर येथून शशिकांतला उचलले. पोलिसांनी पकडल्यानंतर शशिकांतने त्याने केलेल्या अश्लील टिप्पणी खूप मोठी चूक होती असे सांगितले. यापुढे महिलांचा सन्मान करणार असल्याचे नमूद केले. तर सोनाक्षी सिन्हाने या कारवाईनंतर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमSonakshi Sinhaसोनाक्षी सिन्हाPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद