शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

सीताफळ लागवडीतून घेतले चार लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: December 18, 2015 23:31 IST

मोहन बोराडे, सेलू सेलू तालुक्यातील हातनूर येथील तरुण शेतकरी तुषार संजय काकडे याने तीन एकर सीताफळाच्या लागवडीतून यंदा चार लाख तेरा हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले.

मोहन बोराडे, सेलू उच्च शिक्षण सुरु असतानाच शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सेलू तालुक्यातील हातनूर येथील तरुण शेतकरी तुषार संजय काकडे याने तीन एकर सीताफळाच्या लागवडीतून यंदा चार लाख तेरा हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले. हातनूर येथील शेतकरी तुषार संजय काकडे याने बी. एस्सी. तृतीय वर्षात शिक्षण घेत असतानाच सीताफळाची लागवड शेतात केली. तीन एकर शेतामध्ये ही लागवड शेतकरी तुषार काकडे याने केली. आधुनिक तंत्रज्ञान, नियोजन व तज्ज्ञांचा सल्ला घेत सीताफळांचा स्वत:चा मुक्ताई गार्डन हा ब्रॅन्ड या शेतकऱ्याने राज्यात प्रसिद्ध केला आहे. तीन एकर शेतात १० बाय १० या अंतरावर जवळपास ८०० सीताफळांच्या झाडांची लागवड त्यांनी केली आहे. दुष्काळी स्थिती असल्यामुळे यातील निम्मी झाडे पाण्याअभावी जळाली. परंतु, जिवंत झाडांना ठिबकद्वारे पाणी देऊन सीताफळ जगविण्याचे काम त्यांनी केले. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन खत, फवारणी करीत झाडांची जोपासणी केली. यंदाच्या हंगामात ४६५ सीताफळांच्या झाडातून तब्बल ७२३ कॅरेट सीताफळांचे उत्पन्न मिळाले आहे. जवळपास १ किलोच्या आसपास एका सीताफळाचे वजन भरले आहे. ही सीताफळे मुक्ताई गार्डनची असा स्वत:चा ब्रॅण्ड वापरत ४, ६, १२, ३६ नग प्रमाणे पॅकिंग करुन हा माल अकोला येथील बाजारापेठेत त्यांनी विकला. या मालाला चार लाख १३ हजारांचे विक्रमी उत्पन्न त्यांना मिळाले आहे. सीताफळ लागवडीसाठी केवळ ६५ हजार रुपयांचा खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. वडिलांनी शेतात लक्ष घालून आधुनिक शेती करण्यासाठी मला प्रोत्साहित केले. अकोला येथे झालेल्या सीताफळ परिषदेच्या निमित्ताने प्रदर्शनात मुक्ताई गार्डन सीताफळाला अनेकांनी मागणी केली. त्यामुळे अजून मेहनत करुन दोन एकर शेतामध्ये सीताफळाचीच लागवड करणार आहे. -तुषार काकडे सीताफळाचा दर्जा व चवीला मधुर असल्यामुळे अकोला बाजारपेठेत मुक्ताई गार्डनच्या मालाला मागणी वाढू लागली. मोरेगाव येथील प्रगतशील शेतकरी ओमप्रकाश चव्हाळ यांच्या मार्गदर्शनातून तरुण शेतकरी तुषार काकडे याने पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन अकोला बाजारपेठेत स्वत:चा ब्रॅण्ड विकसित केला. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून तुषार काकडे या शेतकऱ्याने शेळीपालन केले आहे. दुधनाच्या कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा नियोजनबद्ध वापर करुन विक्रमी उत्पन्न त्यांनी मिळविले आहे. यामुळे सेलू तालुक्यात शेतकरी तुषार काकडे यांच्या सीताफळ लागवडीची सर्वत्र चर्चा आहे.