शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी तुडुंब असल्याने यावर्षी पूर्ण क्षमतेने आवर्तने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 18:18 IST

धरणावर अवलंबून असलेल्यांना पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणीपुरवठा योजनांना ३१ जुलै २०२० अखेरपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन आहे.

ठळक मुद्देरबी हंगातील एक आवर्तन झालेले आहे, तर एक आवर्तन आताच सोडण्यात आलेले आहे. उन्हाळी हंगामात मार्च ते जून या कालावधीत ४ पाणीपाळी देण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : यंदा जायकवाडी धरण तुडुंब भरले आहे. त्यामुळे जायकवाडीतून उन्हाळी हंगामात पूर्ण क्षमतेने आवर्तन देण्याचे सूतोवाच गुरुवारी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

गुरुवारी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानबाद, लातूर जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पाच्या पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. याबाबत माहिती देताना टोपे म्हणाले,  जायकवाडीत १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. धरणावर अवलंबून असलेल्यांना पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणीपुरवठा योजनांना ३१ जुलै २०२० अखेरपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन आहे. रबी हंगातील एक आवर्तन झालेले आहे, तर एक आवर्तन आताच सोडण्यात आलेले आहे. उन्हाळी हंगामात मार्च ते जून या कालावधीत ४ पाणीपाळी देण्यात येणार आहेत. नांदूर मधमेश्वरमधून रबी हंगामात एक, तर उन्हाळी हंगामात २ आवर्तने दिली जाणार आहेत. निम्म दुधनात १३.३८ टक्केच पाणी असल्याने रबीसाठी एक अवर्तन देण्यात येणार आहे. माजलगाव प्रकल्पातून रबीसाठी २ व उन्हाळ्यात ४ आवर्तने दिली जातील. निम्म तेरणातून केवळ रबीसाठी ३ आवर्तने निश्चित केली आहे. मांजराचे  पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे.

२०४१ मध्ये हक्काच्या पाण्यावर गदाबैठकीत आ. अंबादास दानवे आणि प्रशांत बंब यांनी नांदूर-मधमेश्वर प्रकल्पात आरक्षण वाढविण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे आरक्षण वाढत गेले, तर २०४१ पर्यंत हक्काचे पाणी मिळणार नाही. त्या-त्या काळात दिल्या गेलेल्या आरक्षणाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत शासनस्तरावर पुनर्विचार करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

७० टक्के जागा रिक्तजलसंपदा विभागात ७० टक्के कर्मचाऱ्यांचा जागा रिक्त आहेत. कालवा निरीक्षक, कनिष्ठ अभियंते, अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण येतो. त्यामुळे निवृत्त कर्मचारी, कं त्राटी पद्धतीने घेण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे टोपे म्हणाले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती