शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा निकाल लांबणार, बोर्डाकडून शाळांनी केलेल्या चुकांची युद्धपातळीवर दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 13:54 IST

SSC Result Delayed : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर शाळांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भरलेल्या निकालात चुकांचा भडिमार केला आहे.

ठळक मुद्देशाळांनी निकाल भरताना केलेली ६० टक्के दुरुस्ती पूर्ण शाळांकडून चुका, राहिलेल्या त्रुटी दुरुस्तीचे प्रस्ताव सुरूच

- योगेश पायघनऔरंगाबाद : दहावीचा निकाल भरताना शाळांकडून झालेल्या चुका, राहिलेल्या त्रुटी घेऊन अजूनही शाळांची रीघ बोर्डात लागली आहे. आतापर्यंत केवळ ६० टक्के चुकांची दुरुस्ती बोर्डाकडून पूर्ण झाली असून, उर्वरित ४० टक्के त्रुटी, चुकांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. निकाल सर्वंच विद्यार्थ्यांचा एकाच वेळी लागणार असल्याचे विभागीय परीक्षा मंडळाने स्पष्ट केले असून, चुकांच्या दुरुस्तीसाठी किती वेळ लागेल याचे उत्तर अद्यापतरी नाही. मात्र, ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने निकाल आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता वरिष्ठ अधिकार्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर शाळांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भरलेल्या निकालात चुकांचा भडिमार केला आहे. त्या चुकांची दुरुस्ती करताना नाकीनव आल्याने विभागीय शिक्षण मंडळाकडून पुढे तीन दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती केली. तोही काळ संपला. अद्याप काम पूर्ण झालेले नाही. ७ जुलैपासून दुरुस्त्या सुरू असून, आतापर्यंत केवळ ६० टक्केच चुकांची दुरुस्ती होऊ शकली आहे. अजूनही शाळांकडून राहिलेल्या त्रुटींचे प्रस्ताव येणे सुरूच आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दीडशेहून अधिक शाळांतून दुरुस्तीचे प्रस्ताव आले असून, जिल्हानिहाय पाच कक्षामार्फत दुरुस्तीचे कामे सुरू असल्याचे सोमवारी दिसून आले.

इयत्ता नववी व दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे दहावीचा निकाल लागणार आहे. हा निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लागेल, असे सुरुवातीला सांगण्यात येत होते. त्यानंतर १५ जुलैपर्यंत निकाल लागेल, असे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र, शाळांनी असंख्य चुका निकाल भरताना केल्या आहेत. त्यांची दुरुस्ती आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया आणखी वेळखाऊ होऊ शकते. विभागीय शिक्षण मंडळात दहावीसाठी अर्ज केलेल्या १ लाख ७७ हजार ५७१ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ५६० विद्यार्थ्यांचा निकाल अंतिम केलेला नाही. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात ६०१ जणांच्या निकालाची निश्चिती झाली नाही, तर ९७ विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप अपूर्ण आहेत. तर रीपिटर विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनातही गुणपत्रिकांच्या त्रुटी आहेत, असे विभागीय सचिव पुन्ने यांनी सांगितले.

चुकांच्या दुरुस्तीनंतरच निकालशाळांनी दहावीच्या भरलेल्या निकालात असंख्य चुका आहेत. चुकांचे प्रकार वेगवेगळे आहेत. अजूनही दुरुस्तीचे प्रस्ताव शाळांकडून येतच आहेत. सर्वच विद्यार्थ्यांचा एकाच वेळी निकाल लावावे लागतील. त्यापूर्वी या दुरुस्त्या पूर्ण कराव्या लागणार आहे. त्याला किती वेळ लागले. हे सांगता येणार नाही. ६० टक्के काम झाले आहे. उर्वरित कामही सुरू आहे. राज्य मंडळाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही होईल.-सुगता पुन्ने, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, औरंगाबाद

जिल्हा -शाळा - विद्यार्थीऔरंगाबाद -९०४-६५,०११जालना -३९८-३१,२९६बीड-६५२-४२,५८८परभणी -४२५-२८,४४०हिंगोली -२१६-१६,२७६

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण