शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

लेखकांनी समाजात परिवर्तन घडविणारे, विषमतेवर हल्ला करणारी नाटकं लिहावीत; राजा ढाले यांचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 18:37 IST

समाजातील ‘जाती-पाती, उच्च-नीच’ तेची मनोवृत्ती मोडून काढण्यासाठी विषमतेवर हल्ला करणार्‍या नाटकांची निर्मिती होणे काळाची गरज बनले आहे.  लेखकांनी समाजात परिवर्तन घडविणारे वैचारिक नाटक लिहावे व कलाकारांनीही तेवढाच जिवंत अभिनय करावा, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत राजा ढाले यांनी केले. 

औरंगाबाद : समाजातील ‘जाती-पाती, उच्च-नीच’ तेची मनोवृत्ती मोडून काढण्यासाठी विषमतेवर हल्ला करणार्‍या नाटकांची निर्मिती होणे काळाची गरज बनले आहे. लेखकांनी समाजात परिवर्तन घडविणारे वैचारिक नाटक लिहावे व कलाकारांनीही तेवढाच जिवंत अभिनय करावा, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत राजा ढाले यांनी केले. 

प्रा. त्र्यंबक महाजन व डॉ. कमलाकर गंगावणे संपादित ‘युगयात्रा प्रवाहातील रंगसंहिता’ या ग्रंथाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.  मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात आयोजित प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रल्हाद  लुलेकर होते. ढाले पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्याच्या जगाचा ‘डोळा’ आहे. त्यांनी जगाला दिलेल्या ‘समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्व’ या विचारांवर आधारित ‘मानवतेची परिभाषा शिकविणारे ‘नाटक’ तयार करायला हवे. प्रा. अविनाश डोळस म्हणाले की, ज्यांनी इतिहास घडविला ते इतिहास लिहीत नाही, यामुळे नंतर खोटा इतिहास समोर येतो. ‘मिलिंद’मधील दलित नाट्य चळवळीचा महान इतिहास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी लिहून दस्तावेज तयार करावा.  

युगयात्रा ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने प्रा. विजयकुमार गवई यांनी ‘मिलिंद’मधील नाट्य चळवळीच्या आठवणी सर्वांना सांगितल्या. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा भक्कम वारसा लाभलेल्या दलित रंगभूमीने मराठी नाट्यसृष्टीला विचारावर आधारित अशी नाटके दिली, असा विचार प्रा. अजित दळवी यांनी मांडला. अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी सर्वप्रथम ‘युगयात्रा प्रवाहातील रंगसंहिता’ ग्रंथाचे संपादन केल्याबद्दल प्रा. त्र्यंबक महाजन व डॉ. कमलाकर गंगावणे यांचे अभिनंदन केले. या ज्येष्ठ लेखकांच्या मार्गदर्शनाखाली ‘नागसेनवन’चा वैभवशाली सांस्कृतिक इतिहास लिहिला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन करून भारत शिरसाट यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य प्रभाकर बागले, प्रा. प्रकाश त्रिभुवन, डॉ. आर. के. क्षीरसागर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मिलिंदमध्ये दलित नाट्य चळवळीचे मूळ रुजले प्रा. त्र्यंबक महाजन म्हणाले की, मिलिंद महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत: बसून ‘युगयात्रा’ हे नाटक पाहिले. त्यानंतर खर्‍या अर्थाने येथे दलित नाट्य चळवळीचे बीज रुजल्या गेले. या नाट्य चळवळीचे नाव देशात पोहोचले. त्यावेळी ब्राह्मणाची भूमिका दलित कलाकार करीत असत, तर दलिताची भूमिका ब्राह्मण कलाकार करीत असत, असे एकीचे वातावरण होते. 

सांस्कृतिक, ऐतिहासिक दस्तावेजडॉ. कमलाकर गंगावणे म्हणाले की, २० व्या शतकाच्या ७ व्या दशकात दलित साहित्य नाट्य चळवळ सुरू झाली. तेव्हा नागसेनवन हे चळवळीचे केंद्रंिबंदू होते. ‘युगयात्रा प्रवाहातील रंगसंहिता’हा ग्रंथ सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दस्तावेज आहे.