शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अबब! चार लाख रुपयांत पडणार होता ३ कोटींचा पाऊस; उद्योजकासह दोन भोंदूबाबांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 19:58 IST

जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचा अघोरी प्रकार

छत्रपती संभाजीनगर : चार लाख रुपयांत तीन कोटी रुपयांचा पाऊस पाडण्यासाठी हॉटेलच्या खोलीत बैठक बसली. गंडेदोरे, हारतुरे, ओले, सुके नारळ, कवड्या, जडीबुटी मांडली गेली. पैशांच्या पावसासाठी जय्यत तयारी झाली. जादूटोणा सुरू होताच गुन्हे शाखा खोलीत धडकली. पैशांच्या पावसासाठी सुरू असलेला खटाटोप उघड झाला. पथकाने यात तिघांना अटक करत कोट्यवधी रुपयांचे धनादेशही जप्त केले. गुरुवारी रात्री हॉटेल रविराजमध्ये ही कारवाई करण्यात आली.

विकास प्रकाश उत्तरवार (४२, रा. हिमायतनगर, नांदेड), विलास देवराव कुहिले (४२, रा. जरूळ, वैजापूर), शंकर बबन काजळे (३६, रा. चिकलठाणा), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांना हॉटेल रविराजच्या खोली क्रमांक ३१० व ३१४ मध्ये जादूटोणा करून नोटांचा पाऊस पाडला जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यांच्या सूचनेवरून सहायक निरीक्षक काशीनाथ महांडुळे यांनी पथकासह सायंकाळी ७ वाजता हॉटेल रविराजच्या दोन्ही खोल्यांत प्रवेश केला. खोली क्रमांक ३१० मध्ये तिघेही आरोपी जादूटोण्याच्या तयारीत होते. उत्तरवारने चौकशीत सांगितले की कुहिले व काजळे यांनी त्याला जादूटोणा करून रोख रक्कम तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवले. सहायक निरीक्षक महांडुळे यांनी तत्काळ तिघांना अटक करत पहाटे त्यांच्या विरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

काय आढळले खोलीत?खोलीत जादूटोण्याचे बरेच साहित्य आढळून आले. त्यात विविध जडीबुटी, काळी पावडर, मंत्र लिहिलेले कागद, काळे-लाल कापड, शेंदूर लावलेल्या पुड्या, पांढऱ्या कवड्या, वाळलेले लिंबू यांचा समावेश आहे.

४ लाखांत तीन कोटी!शंकर व विलास हे दोघेही नेहमीच जादूटोणा करतात. त्यांनी उत्तरवारकडून गुरुवारपर्यंत ४ लाख रुपये उकळले होते. त्यात हॉटेलच्याच खोलीत पूजा झाल्यानंतर जवळपास ३ कोटी रुपयांचा पैशांचा पाऊस पडणार, असे आमिष दाखवले होते. यासाठी त्यांनी हजारो बनावट नोटाही सोबत आणल्या होत्या.

उत्तरवार उद्योजक, कोट्यवधींचे धनादेशउद्योजक राहिलेल्या उत्तरवारच्या २०११ पासून जवळपास तीन कंपन्या होत्या. कोरोनाकाळानंतर मात्र तो आर्थिक अडचणीत सापडला. सध्या तो जमिनीचे व्यवहार करतो. डिसेंबर २०२४ पासून तो रविराजच्या खोली क्रमांक ३१० मध्ये एकटाच राहत आहे. त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांचे धनादेश सापडले. कुहिले मंडपाचा व्यवसाय करतो, तर काजळेचे चिकलठाण्यात चहाचे हॉटेल आहे. त्या दोघांसाठी उत्तरवारने दीड महिन्यांपासून खोली क्रमांक ३१४ बुक केली होती.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी