शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

व्वा..! छत्रपती संभाजीनगरातून आता दीड तासांत पोहोचा अहमदाबादेत

By संतोष हिरेमठ | Published: April 01, 2024 3:45 PM

विमानसेवा सुरू : पहिल्याच दिवशी प्रतिसाद, ३ वर्षांनंतर पुन्हा ‘टेकऑफ’

छत्रपती संभाजीनगर : कोरोना प्रादुर्भावात बंद पडलेली अहमदाबादसाठी तब्बल ३ वर्षांनंतर शहरातून रविवारपासून पुन्हा एकदा विमानसेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या विमानसेवेमुळे आता शहरातून अवघ्या दीड तासांत अहमदाबादेत पोहोचता येत आहे.

छत्रपती संभाजीनगरहून उद्योग, व्यापार आणि पर्यटनासाठी अहमदाबाद, तसेच गुजरातमधील अन्य शहरांत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत रस्ते मार्गानेच अहमदाबादला जावे लागत होते; परंतु आता शहरातून विमानाने अवघ्या दीड तासांत अहमदाबाद गाठता येईल. कोरोना प्रादुर्भावात ही विमानसेवा बंद पडली होती. इंडिगोने अखेर ही विमानसेवा पुन्हा एकदा सुरू केली.

हवाई कनेक्टिव्हिटीत वाढअहमदाबाद विमानसेवेमुळे शहराच्या हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ झाली आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद आणि अहमदाबादसाठी आता विमानसेवा उपलब्ध झाली आहे. आता उदयपूरसाठी पुन्हा एकदा विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. शहराहून तब्बल २१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोरोनापूर्वी ही विमानसेवा सुरू झाली होती.

पहिल्या दिवशी किती प्रवासी?पहिल्याच दिवशी या विमानाने अहमदाबादहून ६१ प्रवासी शहरात दाखल झाले, तर छत्रपती संभाजीनगरातून ५५ प्रवासी अहमदाबादला गेले.

आणखी प्रवासी वाढतील३ वर्षांनंतर सुरू झालेले अहमदाबाद विमान अखेर रविवारपासून सुरू झाले. या विमानाची आसन क्षमता ७८ आहे. पुढे प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे.- अक्षय चाबूकस्वार, एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप.

उदयपूर विमानसेवेसाठी प्रयत्नशीलअहमदाबाद विमानसेवा अखेर पुन्हा एकदा सुरू झाली. आता उदयपूर विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. हिवाळी वेळापत्रकात ही विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन.

टॅग्स :airplaneविमानAurangabadऔरंगाबाद