शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

निर्मिकास काळजी ! पक्ष्यांसाठी निसर्गानेच सुरू केले ‘ज्युस सेंटर’, 'ग्लुकोज आणि प्रोटिन'ची कमतरता पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 17:17 IST

पक्ष्यांची ही ज्युस सेंटर्स म्हणजे दुसरे, तिसरे काही नसून, उन्हाळ्यात आकर्षक रंगांच्या फुलांनी फुलून आलेली विविध झाडे होय.

ठळक मुद्देपक्ष्यांना उन्हाळ्यात सनस्ट्रोक होण्यापासून वाचविणारी ही झाडे शहरात अगदीच नगण्य आहेत. पक्ष्यांप्रमाणेच मधमाशा, फुलपाखरे आणि अनेक कीटकांचे उदरभरणही या झाडांद्वारे होते.

औरंगाबाद : होरपळून टाकणाऱ्या उन्हाच्या तडाख्यात थंडावा शोधण्यासाठी आपली पावले नकळत रसवंतीगृह किंवा ज्युस सेंटरकडे वळत असतात. आश्चर्य आणि गंमत म्हणजे अशीच परिस्थिती बऱ्याच पक्ष्यांचीही असते आणि म्हणूनच ऊन वाढले की, ते सुद्धा नकळतपणे निसर्गानेच त्यांच्यासाठी सुरू केलेल्या विविध ज्युस सेंटर्सचा शोध घेऊ लागतात.

पक्ष्यांची ही ज्युस सेंटर्स म्हणजे दुसरे, तिसरे काही नसून, उन्हाळ्यात आकर्षक रंगांच्या फुलांनी फुलून आलेली विविध झाडे होय. याविषयी 'लोकमत'ला माहिती सांगताना पक्षी अभ्यासक डॉ. किशोर पाठक म्हणाले की, काटेसावर, पांगारा, पळस, सोनसावर, कौशी या झाडांना उन्हाळ्याच्या दिवसांत जी भडक परंतु अत्यंत आकर्षक दिसणारी फुले येतात, तीच फुले ऐन उन्हाच्या तडाख्यात पक्षांचे संरक्षण करणारी ठरतात. या झाडांच्या फुलांमध्ये असणाऱ्या मधात ग्लुकोज आणि प्रोटिन भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे या मधाचे सेवन केल्यानंतर पक्ष्यांना सनस्ट्रोकचा त्रास होत नाही.

आपल्याकडे पानझडीची झाडे असल्याने उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पानगळ होते. त्यामुळे या दिवसांमध्ये किडे आणि कीटकांचे प्रमाणही खूप कमी झालेले असते. तसेच पाण्यासाठीही पक्ष्यांना बरीच शोधाशोध करावी लागते. अन्नाचे दुर्भिक्ष्य आणि बऱ्याचदा उष्णतेमुळे केवळ पाणी पिऊन न मिळू शकणारी ऊर्जा यामुळे उन्हाळ्यात पक्ष्यांना या झाडांच्या फुलांमधून मिळते. चष्मेवाला, शिंजीर, सूर्यपक्षी, वटवट्या, शिंपी, पितकंठी चिमणी, कोतवाल, हळद्या, बुलबुल, टोपीवाला, सगळ्या प्रकारच्या मैना, शिक्रा या लहान पक्ष्यांसोबतच पांढऱ्या डोळ्याचा गरुडही पक्ष्यांच्या या ज्युस सेंटरमध्ये बसून मध पित असल्याचे दिसून येते, असेही डॉ. पाठक यांनी सांगितले.

झाडे औषधी गुणधर्माची पक्ष्यांना उन्हाळ्यात सनस्ट्रोक होण्यापासून वाचविणारी ही झाडे शहरात अगदीच नगण्य आहेत. इतर झाडांचा बहर जेव्हा ओसरलेला असतो, तेव्हा ही झाडे फुलून येतात. फेब्रुवारी ते मे हा या झाडांचा हंगाम असून मार्च - एप्रिलमध्ये ही झाडे विशेष बहरून येतात. पक्ष्यांप्रमाणेच मधमाशा, फुलपाखरे आणि अनेक कीटकांचे उदरभरणही या झाडांद्वारे होते. या झाडांचा उपयोग नैसर्गिक रंग बनविण्यासाठी होत असून, ही सगळीच झाडे औषधी गुणधर्माची आहेत. त्यामुळे शहरी भागातसुद्धा या झाडांची लागवड होणे आता गरजेचे बनले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद