शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

world book day : ‘ई-बुक’ पारंपरिक पुस्तकांचे आधुनिक रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 19:52 IST

आजच्या तरुणाईला आणि ‘टेक्नोसॅव्ही’ मंडळींना खुणावत आहे

- रुचिका पालोदकर औरंगाबाद : काळानुसार सगळ्याच गोष्टी बदलत चालल्या आहेत. आधुनिक जीवनशैलीचा हात धरून पारंपरिक गोष्टीत बदल होऊन तिचे नवीन रूप समोर येते, तसेच काहीसे पुस्तकांच्या बाबतीतही झाले आहे. ‘ई- बुक’ हे पुस्तकांचे आधुनिक रूप आजच्या तरुणाईला आणि ‘टेक्नोसॅव्ही’ मंडळींना खुणावत असून, यामुळे आॅनलाईन पद्धतीने वाचन संस्कृती बहरत असल्याचे दिसून येते. २३ एप्रिल हा जगप्रसिद्ध साहित्यिक आणि थोर नाटककार शेक्सपिअर यांचा स्मृतिदिन जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

यानिमित्त वाचन संस्कृतीचा आढावा घेतला असता आजकाल आॅनलाईन पद्धतीने पुस्तके वाचणे आजच्या तरुणांना अधिक भावत असून, याचा सकारात्मकच परिणाम होत आहे, असे या क्षेत्रातील मंडळींनी सांगितले. वाचन संस्कृती कमी होत आहे, अशी कायम ओरड होते, मात्र असे प्रत्यक्षात होत नसून फक्त वाचनाची पद्धत, माध्यमे आणि जागा बदलत आहेत. पुस्तकांच्या जागी ई-बुक आणि वाचनालयाच्या जागी बुक कॅफे, आॅडिओ बुक आले आहेत, असे काही तरुणांनी आणि साहित्य क्षेत्रातील मंडळींनी सांगितले. वास्तववादी, आत्मचरित्र, जीवनकथा, अशा प्रेरणादायी पुस्तकांची मागणी सध्या वाढत आहे, पण त्याचबरोबर शिवाजी सावंत, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, भालचंद्र नेमाडे आदी लेखकांची पुस्तकेही मोठ्या प्रमाणावर वाचली जात आहेत. 

कमी किंमत आणि हवे तिथे उपलब्धअनेकदा पुस्तकांच्या किमती सर्वसामान्यांना परवडतील अशा नसतात. ‘ई-बुक्स’ने नेमकी याच मुख्य अडचणीवर मात केल्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. अत्यल्प किमतीत ‘ई- बुक्स’ डाऊनलोड करून वाचता येतात. याशिवाय पुस्तकाचे कोणतेही ओझे सोबत न बाळगता आपला मोबाईल किंवा लॅपटॉप सुरू केला की हवे तिथे हवे ते पुस्तक वाचता येते. हा ‘ई- बुक्स’चा सगळ्यात मोठा फायदा आहे.

परदेशातील वाचकांसाठी वरदान‘ई- बुक’ वाचन संस्कृतीला पोषकच आहेत. नारायण धारप, पु. ल. देशपांडे, गदिमा यांच्या पुस्तकांना तसेच काल्पनिक कथांवर आधारित ई- बुक्सला वाचकांकडून चांगलीच मागणी आहे. काळाच्या या पाऊलखुणा ओळखून त्या पद्धतीने बदल करणे गरजेचे आहे.  परदेशातील अनेक वाचकांसाठी ई- बुक्स वरदान ठरत आहे. कारण पूर्वी पुस्तकाची प्रत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक दिवस वाट पाहावी लागत होती. पण आता मात्र कोणतेही पुस्तक आॅनलाईन पद्धतीने कायम त्यांच्याजवळ उपलब्ध असते. त्यामुळे वाचन संस्कृतीवर ‘ई-बुक्स’चा झाला तर सकारात्मकच परिणाम होत आहे.- साकेत भांड

टॅग्स :world book dayजागतिक पुस्तक दिनAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी