शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

World Blood Donor Day : औरंगाबादमध्ये निगेटिव्ह रक्तगटाचे दाते जपतोय ‘इंडियन कॅडेट फोर्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 14:00 IST

निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त मिळविणे, हे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठे आव्हान ठरते. ही बाब ओळखून इंडियन कॅ डेट फोर्सने निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तींना एकत्र आणले आहे.

औरंगाबाद : निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त मिळविणे, हे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठे आव्हान ठरते. ही बाब ओळखून इंडियन कॅ डेट फोर्सने निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तींना एकत्र आणले आहे. जेव्हा अशा रक्ताची आवश्यकता असते, तेव्हा दात्याला बोलावून रक्त उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य अविरतपणे सुरू आहे.

इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे म्हणाले, १९९१ पासून रक्तदानाचा हा प्रवास सातत्याने सुरू आहे. शिबिरांचे आयोजन करून प्राधान्याने घाटीतील रक्ताचा तुटवडा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. घाटीत गोरगरीब रुग्ण येतात. त्यामुळे या रुग्णालयाला जास्तीत जास्त रक्त देण्याची आमची भावना आहे.  इंडियन कॅडेट फोर्सचे आज जवळपास ३,५०० सदस्य झाले आहेत. यामध्ये नागरिकांबरोबर विविध महाविद्यालयांतील एनसीसी कॅडेटचा समावेश आहे.

रक्तदान शिबिरांत जर एखादा निगेटिव्ह रक्तगटाचा दाता आला, तर त्याचे रक्त घेतले जात नाही. कारण जेव्हा त्या गटाच्या रक्ताची आवश्यकता असते, तेव्हा ते उपलब्ध व्हावे, हा प्रयत्न असतो, त्यामुळे अशा निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तींची यादी आम्ही तयार केली आहे. जेव्हा आम्हाला अशा रक्ताची आवश्यकता असल्याचे कळते, तेव्हा दात्याला तात्काळ पाठवून गरजू रुग्णाला रक्त दिले जाते. वर्षभरात किमान ५०० रक्ताच्या पिशव्या घाटीतील रक्तपेढीला दिल्या जातात.डॉ. डी. के. कांबळे, अमृत बि-हाडे, प्रभूलाल पटेल, बबलू त्रिवेदी, गौरव भारुका, विशाल देशपांडे, अजय भोसले, जगदीश खैरनार, आनंद आंचलकर, भागूराव जाधव, किशोर नावकर, राहुल अहिरे अशा अनेकांचे रक्तदानाच्या कार्यात योगदान मिळत आहे.

‘घाटी’लाच रक्तदान करावेघाटी रुग्णालयातून गोरगरीब रुग्णांना मोफत रक्त दिले जाते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी घाटीत रक्तदान करण्याची खरी गरज आहे. आज आमच्याकडे निगेटिव्ह रक्तगट असलेल्या १८० व्यक्तींची यादी आहे, त्याचा अनेकांना आधार मिळतो, असे कमांडर विनोद नरवडे म्हणाले.

टॅग्स :World Blood Donor Dayजागतिक रक्तदाता दिवसgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स