शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

कामगार रुग्णालयातील सुरक्षेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 20:23 IST

मुंबईच्या अंधेरी येथील ईएसआयसी (कामगार रुग्णालय) रुग्णालयाला आग लागून ६ जण मृत्युमुखी, तर तब्बल १५४ जण जखमी झाल्याच्या घटनेनंतर ईएसआयसी प्रशासनाला जाग आली आहे. या घटनेनंतर ईएसआयसीच्या औरंगाबाद विभागीय पथकाने सोमवारी पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालय व बजाजनगरातील दवाखान्याची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.

विभागीय पथक : मुंबईतील आगीच्या घटनेनंतर ईएसआयसीला जागवाळूज महानगर : मुंबईच्या अंधेरी येथील ईएसआयसी (कामगार रुग्णालय) रुग्णालयाला आग लागून ६ जण मृत्युमुखी, तर तब्बल १५४ जण जखमी झाल्याच्या घटनेनंतर ईएसआयसी प्रशासनाला जाग आली आहे. या घटनेनंतर ईएसआयसीच्या औरंगाबाद विभागीय पथकाने सोमवारी पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालय व बजाजनगरातील दवाखान्याची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना अल्पदरात चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून ईएसआयसी प्रशासनाने पंढरपूर येथे ईएसआयसीची मॉडेल डिस्पेन्सरी उभारली आहे. या इमारतीसाठी ५ कोटी ९१ लाख रुपये खर्च करून २०१२-१३ मध्ये इमारत बांधली. २०१५ मध्ये माजी केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. रुग्णालय सुरू झाल्यानंतर काही वर्षांत इमारतीच्या भिंतीला तडे जाऊन काचा व फरशा गळून पडायला सुरुवात झाली. यावर दुरुस्तीसाठी प्रशासनाने पुन्हा लाखो रुपये खर्च केले, तरीही इमारतीची पडझड थांबलेली नाही. नोव्हेंबरमध्ये दिवाळीदरम्यान या रुग्णालयातील इंजेक्शन रूम व ड्रेसिंग रूमच्या मधल्या भिंतीला तडे जाऊन छत कोसळल्याची घटना घडली. प्रशासनाने हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून कमालीची गुप्तता पाळली होती; पण ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. येथील डॉ. व्यंकट जांभळे यांनी माहिती देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.

त्यानंतर पुन्हा आठवडाभरापूर्वी सदरील भिंतीचे काही भागाचे छत पडल्याची घटना घडली. याच खोलीत रुग्णांना इंजेक्शन देऊन उपचार केले जातात, तसेच या रुग्णालयाची अग्निशमन यंत्रणाही कार्यान्वित नाही. जनरेटर व लिफ्ट अनेक दिवसांपासून बंदावस्थेत आहे. बजाजनगरातील दवाखान्याची तर फारच वाईट अवस्था आहे. भिंतीला व छताला तडे गेल्याने ही इमारत धोकादायक बनली आहे. पंढरपूर व बजाजनगरातील दवाखान्यात कामगार रुग्णांसह नातेवाईकांची गर्दी असते. रुग्णालयाच्या भिंतीचे छत कोसळण्याच्या घटना घडत असल्याने कामगारांसह डॉक्टरांच्याही जीवितास धोका निर्माण झाला आहे. अग्निशमन यंत्रणा धूळ खात पडल्याने रुग्णालयाला आग लागल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईतील घटनेनंतर जागमुंबई अंधेरी येथील घटनेमुळे ईएसआयसी प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने राज्यातील ईएसआयीसी रुग्णालयाच्या सुरक्षेची पाहणी मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी औरंगाबादच्या विभागीय कार्यालयाचे उपसंचालक संजीव यादव, शाखा प्रमुख पद्मनाभन दातार यांच्या पथकाने पंढरपूर येथील ईएसआयसी रुग्णालय व बजाजनगरातील दवाखान्याची पाहणी करुन सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी डॉ. व्यंकट, संतोष दळवी यांची उपस्थिती होती. या विषयी उपसंचालक यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद