शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

‘साई’ केंद्राच्या अत्याधुनिक जलतरण तलावाचे काम प्रगतिपथाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 18:43 IST

‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रातील आॅलिम्पिक दर्जाच्या व अत्याधुनिक सुविधांयुक्त असणाऱ्या स्विमिंगपूल आणि अ‍ॅस्ट्रोटर्फमुळे ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या वैभवात भर पडली आहे. मराठवाड्याची शान ठरणाºया स्विमिंगपूल आणि अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकीच्या मैदानाचे उद्घाटन मे महिन्यात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी दिली. विद्यापीठ परिसरात उभारण्यात येत असलेला अत्याधुनिक सुविधांयुक्त स्टेनलेस स्टीलच्या जलतरण तलावाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देउद्घाटन सोहळा मे महिन्यात : अ‍ॅस्ट्रोटर्फ, स्विमिंगपूलमुळे ऐतिहासिक शहराच्या वैभवात पडणार भर

जयंत कुलकर्णी ।औरंगाबाद : ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रातील आॅलिम्पिक दर्जाच्या व अत्याधुनिक सुविधांयुक्त असणाऱ्या स्विमिंगपूल आणि अ‍ॅस्ट्रोटर्फमुळे ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या वैभवात भर पडली आहे. मराठवाड्याची शान ठरणाºया स्विमिंगपूल आणि अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकीच्या मैदानाचे उद्घाटन मे महिन्यात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी दिली.विद्यापीठ परिसरात उभारण्यात येत असलेला अत्याधुनिक सुविधांयुक्त स्टेनलेस स्टीलच्या जलतरण तलावाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.साईचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांच्या पुढाकारामुळे या ९ कोटी रुपयेचा खर्च असणाºया अद्ययावत सुविधांयुक्त जलतरण तलावाच्या कामास गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रारंभ झाला. रिओ आॅलिम्पिकच्या धर्तीवर असणारा व स्टेनलेस स्टीलचा भारतातील सर्वांत पहिला स्विमिंगपूल हा ५० बाय २५ मीटर आणि १० लेनचा आहे. याची खोली ही सव्वासहा फूट इतकी आहे. विशेष म्हणजे या स्विमिंगपूलच्या लेनमध्ये थोडीदेखील चूक होतनाही.या स्विमिंगपूलच्या फिल्ट्रेशन प्लांटचे कामदेखील झाले असून, त्यामुळे खराब पाणी तात्काळ स्वच्छ होते. स्विमिंगपूलसाठी ६० फूट खोलीच्या विहिरीचे कामही सुरू आहे. विशेष म्हणजे स्विमिंगपूलच्या चारही बाजूंना झाडे लावणार असून भिंतीची सजावटही केली जाणार आहे.स्विमिंगपूलच्या आवारातच जीम रूम, योगा हॉल, अडीच लाख लिटर क्षमतेचा बॅलन्सिंग टँक, चेंजिंग रुम्स असणार आहे. व्हीआयपी लोकांसाठीही वेगळी व्यवस्था केली जाणार आहे, असे या स्विमिंगपूलचे काम पाहणाºया शासनाच्या नॅशनल प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन कॉपोर्रेशनचे अभियंता दिनकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.उद्घाटनाला राज्यवर्धनसिंह राठोड येणार?अत्याधुनिक सुविधांयुक्त अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकीचे मैदान आणि स्विमिंगपूलचे उद्घाटन मे महिन्यात करण्यात येणार आहे.उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री आणि आॅलिम्पिकमध्ये देशाला नेमबाजीत रौप्यपदक जिंकून देणारे राज्यवर्धनसिंह राठोड तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.मुव्हेबल असणार प्रेक्षागृह१५०० जणांची क्षमता असणारे इलेक्ट्रॉनिक बटनाद्वारे कोणत्याही स्थळी हलवू शकणारे टी बॉक्स सीटिंग अ‍ॅरेंज प्रेक्षागृहही उभारले जाणार आहे. त्यासाठी १.३ कोटी रुपयांचा खर्च असणार आहे.त्याचप्रमाणे अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदान प्रेक्षणीय आणि सुंदर दिसावे तसेच थकलेल्या खेळाडूंना रिलॅक्स होण्यासाठी मदत व्हावी यासाठी १५०० झाडे लावण्यात आली आहेत, असे वीरेंद्र भांडारकर म्हणाले.अत्याधुनिक सुविधांमुळे स्विमिंगपूल वर्षात एकदाच रिसायकलिंग करावे लागणार आहे. तसेच स्विमिंगपूलचे पाणी निळे राहणार आहे.