शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय संकुलाचे बांधकामाची मंत्रालयाच्या आदेशाची पायमल्ली करीत वर्कऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 19:17 IST

प्रशासकीय संकुलाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वीच निविदा स्तरावर संशयकल्लोळ

 

छत्रपती संभाजीनगर : मंत्रालयाच्या आदेशाची पायमल्ली करीत विश्वासनगर, लेबर कॉलनी येथील प्रस्तावित १२५ कोटींच्या प्रशासकीय संकुलाचा कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी बदलला आहे. एल-१ म्हणून शासनाने ज्या कंत्राटदाराची निविदा नक्की केली, त्याऐवजी दुसऱ्या कंत्राटदाराला वर्कऑर्डर देण्यात आली आहे. हा सगळा प्रकार संशयास्पद असून, आ. प्रशांत बंब यांनी प्रकरणात मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे, अधीक्षक अभियंता एस. एस. भगत यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

‘लोकमत’ने निविदा, वर्कऑर्डर प्रकरणात सुरू असलेला गैरप्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी आ. बंब यांनी नियमांना धरून तक्रार केली. तत्पूर्वी कंत्राटदार बदलण्यासाठी शासनाकडून अभिप्राय न घेताच स्थानिक पातळीवर हा सगळा गैरप्रकार होत असल्याचे लक्षात येताच मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंत्यांनी प्रशासकीय संकुलाचे काम जागतिक बँक प्रकल्प विभागाकडे वर्ग करण्याचे पत्र येरेकर यांना दिले होते. परंतु, त्यांनी पत्राला केराची टोपली दाखवीत एल-२ कंत्राटदाराची निविदा मंजूर करून वर्कऑर्डरही देऊन टाकली. त्यामुळे हा प्रकार संशयास्पद आहे. गेल्या वर्षी काढलेल्या निविदांचे प्रकरण काेर्ट, एसीबीपर्यंत गेले. त्यानंतर शासनदारी निविदांचे प्रकरण गेले. शासनाने दुसऱ्यांदा निविदा मागविण्याची परवानगी दिल्यानंतर एल-१ म्हणून पुण्यातील कंत्राटदाराची निविदा मंजूर केली. परंतु, बँक गॅरंटी व इतर पत्रव्यवहाराचे कारण पुढे करीत कार्यकारी अभियंत्यांनी एल-२ कंत्राटदाराला वर्कऑर्डर देऊन टाकली. यात मोठ्या ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी झाल्याची चर्चा असून, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंत्यांनादेखील खालील यंत्रणा जुमानत नसल्याचे दिसते. राहुल वडमारे यांनीदेखील या प्रकरणात शासनाकडे तक्रार केली आहे.

मुख्य अभियंता ‘नाॅट रिचेबल’....मुख्य अभियंता कातकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते ’‘नॉट रिचेबल’ होते. अधीक्षक अभियंता भगत यांना विचारले असता, त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. कार्यकारी अभियंता येरेकर यांनी फोनच घेतला नाही. मेसेज केल्यानंतरही त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही.

सगळा प्रकार बेकायदेशीर...एल-१ कंत्राटदाराने बँक गॅरंटी दिलेली असताना त्याची ‘ईएमडी’ कार्यकारी अभियंत्यांनी ‘फाॅरफीट’ का केली. शासन स्तरावरून एल-१ निविदा अंतिम झाल्यानंतर सक्षम अधिकारी मुख्य अभियंता असताना कार्यकारी अभियंत्यांनी २५ नोव्हेंबरला कोणत्या अधिकारात ही कार्यवाही केली ? कार्यकारी अभियंत्यांसह विभागीय लेखाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. लेखाधिकाऱ्यांनी एल-१ ची ईएमडी फॉरफीटची नोंद अकाऊंट ऑब्जेक्शन बुकमध्ये घेतली नाही. या सगळ्या प्रकारामुळे शासनाचे मोठे नुकसान झाले.- प्रशांत बंब, आमदार, भाजप

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMantralayaमंत्रालय