शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

औरंगाबाद ते पैठण महामार्गाचे काम सुरू होण्यास लागणार सहा महिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 19:32 IST

भूसंपादनानंतर होणार निविदा प्रक्रिया : आक्षेप, हरकतींची सुरू आहे सुनावणी

- विकास राऊतऔरंगाबाद : औरंगाबाद ते पैठणसह २२५३ कोटी रुपयांच्या चार महामार्गांचे भूमिपूजन २४ एप्रिल रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले असले तरी प्रत्यक्षात त्या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू होण्यासाठी किमान सहा महिने लागणार आहेत. औरंगाबाद ते पैठण सुमारे १६०० कोटींचा हा महामार्ग चौपदरी करण्यात येणार आहे.

भूसंपादन प्रक्रियेबाबत आलेले आक्षेप, हरकतींच्या सुनावण्यानंतर निविदा प्रक्रिया होणार आहे. निविदा मागविल्यानंतर पुढे आणखी किती दिवस जातील, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे भूमिपूजन झाल्याबरोबर महामार्गाचे काम सुरू होईल, असे नागरिकांना वाटत होते,परंतु प्रत्यक्षात काम सुरू होण्यास सहा महिने लागणार आहेत. २४ एप्रिल २०२२ रोजी सोलापूर-धुळे हायवेअंतर्गत औरंगाबाद ते तेलवाडी व इतर तीन मिळून ३३१७ कोटींच्या चार महामार्ग प्रकल्पांच्या लोकार्पणासह औरंगाबाद ते पैठण महामार्गाचे भूमिपूजन करण्यात आले.

औरंगाबाद ते पैठण एनएच क्रमांक ७५२-ईचे रुंदीकरण १२ वर्षांपासून रखडले असून आता भूसंपादनासह चौपदरी डांबरीकरणाचे भूमिपूजन झाले आहे. भारतमाला प्रकल्पाचा भाग असलेला या महामार्गासाठी अंदाजित १६०० कोटी खर्च करण्यात येणार आहेत. १२ वर्षांपासून ‘लोकमत’ने वारंवार या रस्त्याच्या रुंदीकरणाचा पाठपुरावा शब्दबद्ध केला. पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, एनएचएआय या तीन यंत्रणांच्या टोलवा-टोलवीत १२ वर्षे गेले. २०१० ते २०१३ या काळामध्ये पीडब्ल्यूडीकडून ३०० कोटींतून रस्ता करण्यासाठी दोन वेळा निविदा काढल्या. नंतर एमएसआरडीसीचा डीपीआर मग, एनएचएआयकडे कामाची जबाबदारी दिली गेली. अखेर केंद्रीय दळणवळण खात्यांच्या योजनेत औरंगाबाद ते पैठण या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश झाला. तरीही सहा महिने प्रत्यक्ष कामासाठी लागणार आहेत.

५० हून अधिक आले आहेत आक्षेपया महामार्गासाठी १०० हेक्टरच्या आसपास भूसंपादन करण्यात येणार असून, त्याविरोधात ५० हून अधिक आक्षेप आले आहेत. काही आक्षेप निकाली काढले असून अलायमेंट चेंज करण्यासह इतर आक्षेप निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आक्षेपांचा निपटारा झाल्यानंतर भूसंपादन सुरू होईल. त्यानंतर निविदेसाठी एनएचएआय मुख्यालय दिल्लीतून निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात होईल.

९० टक्के भूसंपादन झाल्यानंतर काम सुरू होईलभूमिपूजनाला आता एक महिना झाला आहे. भूसंपादन प्रक्रिया आता सुरू होण्यात आहे. मोजमाप झाल्यानंतर तीन ते चार महिने लागतील. ९० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय काम सुरू होत नाही. निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भूसंपादनाची रक्कम अदा करण्यात येईल. निविदा प्रक्रिया एनएचएआय मुख्यालयातून होणार आहे. त्यानंतर कंत्राटदार ठरेल,मग काम सुरू होईल. भूमिपूजन झाले की,लगेच काम सुरू होत नाही, बाकीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काम सुरू होते.- अरविंद काळे, प्रकल्प संचालक, एनएचएआय.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका