शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन योजनेचे काम सुरू होणार

By admin | Updated: May 23, 2014 00:24 IST

कळमनुरी : शहरासाठी सुजल निर्मल अभियानांतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून ही योजना २० कोटी १५ लाख ४५ हजारांची असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी के.एम. विरकुंवर यांनी दिली.

कळमनुरी : शहरासाठी शासनाने सुजल निर्मल अभियानांतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली असून ही योजना २० कोटी १५ लाख ४५ हजारांची असल्याची माहिती नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी के.एम. विरकुंवर यांनी दिली. नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम एक ते दीड महिन्यात सुरू होणार आहे. या योजनेला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली आहे. इसापूर धरणापासून संपूर्ण शहरात व सर्व नवीन वस्त्यांत पाईपलाईन केली जाणार आहे. धरणाजवळ नवीन विहीर, पाणी स्टोरेज मशिन, शहराजवळ जलशुद्धीकरण केंद्र, नवीन वस्त्यांसह शहरातील पाईपलाईन या रकमेतून केल्या जाणार आहे. जुन्या पाईपलाईनचे पाणी काही वस्त्यांत येण्यासाठी अडचण निर्माण होत होती. शिवाय लिकेजेसही जास्त होते व नवीन वस्त्यात पाईपलाईन नव्हती. सध्या शहराला एक दिवसाआड प्रति माणसी ७० लिटर पाणी नळाद्वारे सोडल्या जात आहे. सध्या शहरात १ हजार ९९८ नळ कनेक्शन आहेत. नवीन पाणी पुरवठा योजनेनुसार नळ कनेक्शन वाढून न.प.च्या करातही भर पडणार आहे. सध्या इसापूर धरणातील १.३३ दलघमी पाणी न.प.ने आरक्षित केले आहे. ही पाणी पुरवठा योजना एक ते दीड वर्षात पूर्ण होवून सर्वच शहराला नळाद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. या योजनेसाठी खा. राजीव सातव, नगराध्यक्षा सादीया तबस्सूम म. रफीक आदींनी प्रयत्न केले. (वार्ताहर)