शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

जळगाव रस्त्याचे काम निधीअभावी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 18:52 IST

नॅशनल हायवेच्या या भोंगळ कारभाराचा फटका हजारो नागरिकांना बसत आहे. 

ठळक मुद्दे दीडशे कि.मी.मध्ये पन्नास ठिकाणी धोकादायक खोदकाम

औरंगाबाद : मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख रस्ता म्हणजे औरंगाबाद- जळगाव होय. तब्बल १२०० कोटी रुपये खर्च करून या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम दीड वर्षापूर्वी हाती घेण्यात आले आहे. १५० कि. मी. अंतरावरील या रस्त्यात पन्नास ठिकाणी कंत्राटदाराने खोदकाम करून ठेवले आहे. रात्री वेगवेगळ्या अपघातात आतापर्यंत २५ पेक्षा अधिक निष्पाप दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे. मागील दीड महिन्यापासून रस्त्याचे काम निधी नसल्याचे कारण समोर करून बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नॅशनल हायवेच्या या भोंगळ कारभाराचा फटका हजारो नागरिकांना बसत आहे. 

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक औरंगाबादहून जातात. औरंगाबाद ते जळगाव रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था असताना तो सिमेंट पद्धतीने तयार करण्याचा निर्णय घेतला. पूर्वीपेक्षा रस्ता रुंद करण्याचे निश्चित झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एनएचएआयकडे रस्ता हस्तांतरित करण्यात आला. तब्बल १२०० कोटी रुपयांची निविदा काढून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. 

औरंगाबाद ते फुलंब्रीपर्यंत रस्ता चौपदरी तर पुढे जळगावपर्यंत तीनपदरी ठेवण्यात येईल. डिसेंबर २०१७ मध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. कंत्राटदाराने अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे रात्री रस्त्याच्या बाजूला असलेले खोल खड्डे अजिबात दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २५ पेक्षा अधिक निष्पाप दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. कंत्राटदार सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना करायला तयार नाही. दिवसभर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना, वाहनधारकांना अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. औरंगाबाद-जळगाव रस्ता पूर्वी जेवढा खराब होता, त्यापेक्षा कितीतरी जास्त आता कंत्राटदाराने खराब करून ठेवला आहे.

निधीअभावी काम बंद१२०० कोटी रुपयांच्या या कामासाठी नॅशनल हायवेने निधी उपलब्ध करून दिला होता. मागील दीड महिन्यापासून कंत्राटदाराने रस्त्याच्या कडेला सर्व यंत्रसामुग्री बांधून ठेवली आहे. निधी संपल्याने काम बंद झाल्याचे कंत्राटदाराचे कर्मचारी सांगत आहेत. निधी आल्याशिवाय काम सुरू होणार नाही, असेही सांगण्यात येत आहे. 

औरंगाबाद -जळगाव रस्त्यावरील प्रमुख गावेहर्सूल, सावंगी, चौका, बिल्डा फाटा, फुलंब्री, पाल फाटा, महाल किन्होळा फाटा, आळंद, केºहाळा फाटा, माणिकनगर, सिल्लोड, गोळेगाव, अजिंठा गाव, फर्दापूर, वाकोद, पहूर, नेरी, जळगाव.

संथगतीने कामहर्सूल गावापासून पुढे रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. कुठेच रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. विस्तारीकरणासाठी दोन्ही बाजूने मोठमोठे खड्डे करून ठेवण्यात आले आहेत. हे काम एवढ्या संथ गतीने सुरू आहे की या रस्त्यावरील विविध गावांतील नागरिक त्रस्त झाले आहेत.

बससेवा पूर्वीप्रमाणेचऔरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील एकही बस किंवा फेरी कमी करण्यात आलेली नाही. सर्वाधिक बसेस फुलंब्रीपर्यंत आहेत. बसची संख्या कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. जळगाव डेपोकडूनही बस कमी करण्यात आलेल्या नाहीत. - प्रशांत भुसारी, विभागीय नियंत्रक

१० मार्चपर्यंत निधी येईलआंध्र प्रदेश येथील एका कंपनीने रस्ता विकसित करण्याचे काम घेतले आहे. कंपनीने आतापर्यंत केलेल्या कामाचे बिल नॅशनल हायवेकडे सादर केले आहे. तब्बल ४० कोटींची ही बिले आहेत. कंत्राटदाराला बिलाचे पैसे देण्यासाठी आमच्याकडे निधी नाही. १० मार्चपर्यंत निधी येणार आहे. निधी येताच कंत्राटदार परत काम सुरू करणार आहे. -एल. एस. जोशी, अधीक्षक अभियंता, नॅशनल हायवे

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादfundsनिधी