शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

वाहनांच्या वर्दळीमुळे खोळंबली जुन्या बीड बायपासवरील उड्डाणपुलांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 19:39 IST

When will the old Beed bypass be safe? पावसाळ्यापूर्वी अडथळ्याचे बहुतांश टप्पे पूर्ण करण्याचा जागतिक बँक प्रकल्प विभागाचा प्रयत्न आहे.

ठळक मुद्देकेंब्रीज शाळेजवळ (जालना रोड), देवळाई चौक, संग्रामनगर आणि एमआयटी कॉलेजजवळ असे चार उड्डाणपूल उभारले जाणार पोलीस प्रशासनाकडे आम्ही वाहतूक नियमनासाठी प्रस्ताव दिलेला आहे

- विजय सरवदे

औरंगाबाद : वाहनांच्या चोवीस तास वर्दळीमुळे जुन्या बीड बायपास रस्त्यावरील चार उड्डाणपुलांची कामे खोळंबली आहेत. बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाने या रस्त्यावरील वाहतूक नियमनासाठी पोलीस प्रशासनाकडे प्रस्ताव दिला असून, तो मंजूर झाला तरच उड्डाण पुलांच्या कामांना सुरुवात होऊ शकते.

मृत्यूचा सापळा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या बीड बायपास (बाह्यवळण रस्ता) रस्त्याचे रुंदीकरण अर्थात सर्व्हीस रोड (साईड पट्ट्या), उड्डाणपूल व मजबुतीकरणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून रेंगाळत पडला होता. केंद्र व राज्य सरकारने अनेक पर्याय शोधले. पण, त्यासाठी निधीची उपलब्धता होत नव्हती. अलिकडेच हायब्रीड अन्युटी उपक्रमातून या रस्त्याच्या मजबुतीकरणाचा ठराव संमत झाला. यासाठी २९२ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विभागांच्या खर्चाला कात्री लावली. मात्र, बीड बायपासच्या निधीला हात न लावता कामे सुरू ठेवली. निविदा प्रक्रियेनंतर 'जीएनआय मनजीत जॉइंट व्हेंचर'ला हे काम मिळाले. प्रशासकीय मंजुरी व अन्य प्रक्रिया दोन-तीन महिने चालली.

एप्रिल २०२० पासून या रस्त्याचे काम सुरू होणार होते. तेवढ्यात लॉकडाऊनमुळे सर्वच कामे ठप्प झाली. अनलॉकनंतर कामाने गती घेतली. आता मजबुतीकरण व विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास संपत आले आहे. साईडपट्ट्यांचे मातीकाम संपल्यानंतर मजबुतीकरणाची कामे सुरु केली जाणार आहेत. मात्र, सध्या या रस्त्यावर ‘एमआयडीसी’ची जलवाहिनी व महावितरणकडून विजेच्या तारा, खांब हटवणे बाकी आहे. याविषयी देखील संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांकडून ही कामे लवकर झाली तर बायपासच्या कामाचा वेग कायम राहू शकतो.

या रस्त्यावर केंब्रीज शाळेजवळ (जालना रोड), देवळाई चौक, संग्रामनगर आणि एमआयटी कॉलेजजवळ असे चार उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. देवळाई चौकापासून झाल्टा फाट्याकडे तसेच महानुभाव आश्रम चौकाकडून एमआयटीकडे मजबुतीकरण, साईडपट्ट्याचे काम केले जात आहे. संबंधित यंत्रणांकडून सहकार्य मिळाले, तर काँक्रिटीकरण व उड्डाणपुलांची कामे तातडीने सुरू होतील. पावसाळ्यापूर्वी अडथळ्याचे बहुतांश टप्पे पूर्ण करण्याचा जागतिक बँक प्रकल्प विभागाचा प्रयत्न आहे.

वाहतूक नियमनानंतर गतीने होतील कामेजागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता भंडे यांनी सांगितले की, या रस्त्यावर जड वाहनांबरोबर हलक्या वाहनांची मोठी वाहतूक आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडे आम्ही वाहतूक नियमनासाठी प्रस्ताव दिलेला आहे. याबाबत येत्या आठ दिवसांत वाहतूक नियमनाची कारवाई होईल. दुसरीकडे, जलवाहिनी व विजेचे खांब आणि तारा हटविण्याची कारवाईदेखील लवकरच होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रस्ता मजबुतीकरण व चार उड्डाणपुलांची कामे गतीने सुरू होऊ शकतात.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग