शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 18:47 IST

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू झाले असून, इस्रायलमधील शासकीय कंपनी मेकोरॉटच्या दोनसदस्यीय शिष्टमंडळाने गोदावरी विकास महामंडळ, वाल्मी आणि विभागीय आयुक्तालयात ग्रीडच्या अनुषंगाने प्राथमिक बैठका घेतल्या.

औरंगाबाद : मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू झाले असून, इस्रायलमधील शासकीय कंपनी मेकोरॉटच्या दोनसदस्यीय शिष्टमंडळाने गोदावरी विकास महामंडळ, वाल्मी आणि विभागीय आयुक्तालयात ग्रीडच्या अनुषंगाने प्राथमिक बैठका घेतल्या. मंगळवारी शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तालयात बैठक घेतली. 

मेकोरॉट कंपनीला पाण्याशी संबंधित आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आजच्या बैठकीत इस्रायलच्या सदस्यांना सांगितले. मराठवाडापाणीपुरवठा कृती आराखड्याबाबत (वॉटर ग्रीड) डॉ. भापकर यांनी इस्राायलचे डिएगो बर्गर, इयरोन गेलर यांच्याशी संवाद साधला. बर्गर, गेलर यांनी इस्रायलमधील पाण्याच्या मूल्यमापनाबाबत पावर पॉइंटवर सादरीकरण केले. पाण्याची साधने, क्षेत्र निवड, लघु, मध्यम आणि दीर्घ नियोजन, प्रशिक्षण, शिक्षण, अंमलबजावणी याबाबतचा सादरीकरणात समावेश होता. 

मराठवाड्यातील पीकपद्धतीत बदल, पाण्याशी संबंधित विभाग याबाबत सदस्यांसोबत चर्चा झाली. मराठवाड्यातील सद्य:स्थिती, पाणी वापराची स्थिती व नियोजन याचीही माहिती डिएगो बर्गर, इयरोन गेलर यांना बैठकीत दिली. वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, मेकोरॉट कंपनीचे भारतातील प्रमुख रोमील सॅम्युअल, अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर.एस. लोलापोड, अधीक्षक अभियंता अजय सिंग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, साहेबराव दिवेकर, स्वप्नील सरदार आदींची बैठकीला उपस्थिती होती. बर्गर, गेलर यांनी इस्रायलनी पाणी वापराबाबत सुचविलेल्या उपायांवर आधारित असलेल्या सेठ सिएगललिखित ‘लेट दिअर बी वॉटर’ या पुस्तकाची प्रत आयुक्तांना यावेळी दिली. महासंचालक सिंगला, टाकसाळे, लोलापोड यांनी इस्रायलच्या सदस्यांशी संवाद साधला.

पर्यावरणाचा अभ्यास करणार वाल्मीचे महासंचालक दीपक सिंघला यांनी सांगितले, २ वर्षे ग्रीडसाठी सर्वांगीण माहिती संकलित केली जाणार आहे. वाल्मी आणि आयुक्तालय, गोदावरी महामंडळ येथे सदस्यांसोबत बैठक झाली. मराठवाड्यातील पर्जन्यमान, धरणांची क्षमता, प्रकल्पांची सद्य:स्थिती, पर्यावरणाचा अभ्यास दोन वर्षांमध्ये केला जाणार आहे. इस्रायल येथून सध्या दोन सदस्य आले आहेत. पुढच्या सत्रात त्यांची पूर्ण टीम येईल. ३ दिवसांच्या भेटीवर ते सदस्य आले आहेत. आधारभूत माहितीचे संकलन ते करीत आहेत. वाल्मी, गोदावरी विकास महामंडळात त्यांनी बैठक घेऊन सादरीकरण केले.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाDr Purushottam Bhapkarडॉ पुरुषोत्तम भापकरgodavariगोदावरी