शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

धक्कादायक वास्तव! राज्यात दिवसाला ११४ महिला होतायेत बेपत्ता, सर्वाधिक १८ ते ३५ वयोगटातील

By सुमित डोळे | Updated: March 8, 2025 19:27 IST

Women's Day Special: ८५.२ टक्के १८ ते ३५ वयोगटातील; कौटुंबिक छळ, ताणतणाव, प्रेम, गैरसंबंध प्रमुख कारणे, तपास मात्र संथगतीनेच

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे महिलांचा आदर, सन्मानाच्या गप्पा होत असताना दुसरीकडे राज्यात ११४ ते १३० महिला रोज बेपत्ता होत आहेत. गतवर्षी ४१ हजार ७४० महिला बेपत्ता झाल्या. यात ८५.२% महिला या केवळ १८ ते ३५ वयोगटातील असल्याचे धक्कादायक सामाजिक वास्तव अहवालातून दिसतेय.

कौटुंबिक वाद, ताण-तणाव, प्रेम प्रकरण, विवाहबाह्य संबंधासारखी कारणे अनेक असली तरी महिलांचे बेपत्ता होणे व त्याच्या संथ तपासाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेकदा तरुणी, महिलांना जाळ्यात ओढून वाममार्गाला लावले जात असल्याची शंका अनेकदा व्यक्त झाली. महिला दिनानिमित्त घेतलेल्या आढाव्यात गेल्या पाच वर्षांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्ये राज्यात ३०,००० च्या आसपास असलेले महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण २०२४ मध्ये ४१,७४० पर्यंत गेले. गतवर्षीच्या तुलनेत २०.२५% वाढ झाली आहे.

वयोगटानुसार बेपत्ता महिलांचे प्रमाण (२०२५)वयोगट (वर्षे)- महिला -टक्केवारी (%)१८-३५ -३५,५७०-८५.२%३५-५० -३,९२८ -९.४%५१-८० -२,०४० -४.९%८० - २०८ - ०.५%

सहा वर्षांत २०.२५% नेवर्षे - बेपत्ता महिला - टक्केवारी२०१९ - ३५,९९० --२०२० -३०,०८९ - (-१६.३९%)२०२१ - ३४,७६३ - ( १५.५३%)२०२२ - ३२,८०४ - (-५.६३%)२०२३ - ३४,७०९ - ( ५.८०% )२०२४ - ४१,७४० - (२०.२५%)

खंडपीठाने सुनावले होतेलहान मुले, महिला बेपत्ता होण्याची अनेक कारणं असू शकतात. त्यांचा शोध घेणे, संरक्षण व आवश्यकेनुसार त्यांना सुरक्षित निवारा देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्यातील विविध यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ऑगस्ट, २०२४ मध्ये व्यक्त केले होते.

गेली पळून म्हणून गांभीर्य नाहीपोलिस ठाण्यांमध्ये घर सोडून गेलेल्या महिला, तरुणींच्या तक्रारींचा गांभीर्याने तपास होत नाही. ठाण्याच्या पातळीवर तीन महिन्यांत मुलगी न सापडल्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपास वर्ग होतो. मात्र, तरीही अपुरे मनुष्यबळ, कमी साधनांमुळे तपास संथगतीने होतो. सापडून न आलेल्या महिला, मुलींचे काय होते, याचाही योग्य तपास होत नाही.

 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWomen's Day Specialजागतिक महिला दिन