शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाटीवर चालण्याऐवजी पेन्सिल जातेय महिलांच्या पोटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:47 IST

पाटीला नव्हे, पण पाटीवरच्या पेन्सिलीला भरमसाठ मागणी

ठळक मुद्देआता पूर्व प्राथमिक शिक्षणासाठीही पाटी- पेन्सिल वापरली जात नाही,तरीही पाटीवरच्या पेन्सिलींची मागणी मात्र किंचितही कमी झालेली नाही.

औरंगाबाद : हातात लेखणी धरून पाटीवर लिहिण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. ग्रामीण भागातील शाळा किंवा शहरी भागातील काही तुरळक शाळा सोडल्या तर कोणत्याही शाळेत आता पूर्व प्राथमिक शिक्षणासाठीही पाटी- पेन्सिल वापरली जात नाही, असे असतानाही पाटीवरच्या पेन्सिलीला मात्र प्रचंड मागणी आहे. याचे कारण म्हणजे या पेन्सिली पाटीवर लिहिण्यासाठी नव्हे तर खाण्यासाठी घेऊन जात असल्याचे काही दुकानदारांनी सांगितले.

याविषयी सांगताना काही दुकानदार म्हणाले की, सध्या तर शाळांना सुट्या आहेत, यामुळे इतर स्टेशनरी साहित्याची मागणी मंदावलेली असते. पण तरीही पाटीवरच्या पेन्सिलींची मागणी मात्र किंचितही कमी झालेली नाही. त्यांच्या दुकानात दररोज एक तरी महिला पाटीवरच्या पेन्सिलीचा पुडा मागण्यासाठी येते. त्यामुळे पाट्या नाही मागविल्या तरी पाटीवरच्या पेन्सिली मात्र आम्हाला आवर्जून मागवाव्याच लागतात, असे या दुकानदारांनी सांगितले. कुमारवयीन मुलींपासून ते मध्यमवयीन महिलांचा या वयोगटात सहभाग आहे. 

गमतीचा वाटत असला तरी हा विषय गंभीर असून, अनेक महिलांच्या आरोग्याशी निगडित आहे. डॉक्टरांच्या मते माती, पेन्सिल, खडू, भिंंतीचा रंग यासारख्या वस्तू खाव्या वाटणे हा एक प्रकारचा आजार आहे. अशा व्यक्तींना अ‍ॅनिमिया असतो तसेच शरीरातील कॅल्शियम, झिंक, लोह यांचे प्रमाण कमी झालेले असते. अशा महिलांच्या पोटात जंत असू शकतात. पाटीवरच्या पेन्सिलला असलेल्या मागण्यांमुळे विविध ब्रॅण्डच्या पेन्सिली आता आॅनलाईन शॉपिंग साईटवर मागविण्याची सुविधाही उपलब्ध आहे. यावरूनच या पेन्सिलींची लोकप्रियता दिसून येते.

पेन्सिली मागायला येतात अनेक महिला...अनेक वर्षांपासून दुकान असल्यामुळे साधारणपणे आमच्या परिसरात असणाऱ्या घरातील सदस्यांविषयी आम्हाला माहिती असते. पेन्सिली मागायला अशा काही महिला येतात, ज्यांच्या घरात शाळेत जाणारे कोणीही नसते. त्यामुळे सहज म्हणून या महिलांना विचारले असता, त्यांनी ही पेन्सिल आपण लिहिण्यासाठी नव्हे तर खाण्यासाठी नेत आहोत, असे सांगितले आणि या अजब प्रकाराचा शोध लागला, असे एका विक्रे त्याने सांगितले. बहुतांश मुलींनी लहानपणी एकदा तरी पाटीवरच्या पेन्सिलींचा आस्वाद घेतलेला आहेत. पण वयोमानानुसार ही सवय मागे पडून सुटत गेली आणि आता त्यांना या पेन्सिली खाव्या वाटत नाहीत, असेही काही महिलांशी चर्चा केल्यावर समोर आले. 

टॅग्स :SchoolशाळाWomenमहिलाStudentविद्यार्थी