शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

१८ ग्रामपंचायतींचा कारभार हाकणार महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:35 AM

तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींवर महिला सरपंचांची निवड झाली आहे. विजयी झालेल्या बहुतांश उमेदवार आपल्या पक्षाचा असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

जालना : २७ पैकी सर्वाधिक जागांवर सेनेचा दावाबाबासाहेब म्हस्केजालना : तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींवर महिला सरपंचांची निवड झाली आहे. विजयी झालेल्या बहुतांश उमेदवार आपल्या पक्षाचा असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. दुस-या टप्प्यातील २७ ग्रापंचायतींसाठी सोमवारी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये मतमोजणी झाली. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात आले.२९ पैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने २७ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान झाले होते. या ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सोमवारी तहसीलदार विपिन पाटील, नायब तहसीलदार संदीप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली.मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवार, सदस्य व त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्या फेरीत राममूर्ती, ढगी, पानशेंद्रा, साळेगाव नेर, पीरपिंपळगाव या गावांची मतमोजणी झाली. त्यानंतर दुस-या, तिस-या, चौथ्या आणि पाचव्या फेरीमधील गावांचे निकाल जाहीर झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार बाहेर उभ्या असलेल्या समर्थकांना हात उंचावून विजयी झाल्याचे सांगत होते. विजयी उमेदवार बाहेर येताच त्यांचे समर्थक गुलाल उधळत जल्लोष करताना दिसून आले. मतमोजणी स्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.----------जालना तालुक्यातील सरपंचपदाचे उमेदवारराममूर्ती - सुमन मगरअहंकार देऊळगाव - मंगल सोमधानेसाळेगाव (हडप) - विनायक गुळमकरमोतीगव्हाण - सुरेखा मोहितेमोहाडी - लक्ष्मण पवारढगी - मारोती केंद्रे,धावेडी-थार - प्रभाकर ईटकरवरखेडा (सिंदखेड) - वर्षा खरात,पाष्टा - प्रकाश इलगमाळी पिंपळगाव- रामकला पितळेपानशेंद्रा - रेणुका पाचरणेगवळी पोखरी - आश्विनी वाघमारसावरगाव हडप - शकुंतला आढावमानेगाव (खा) - पदमाकर हांडेखांबेवाडी-नागापूर - द्वारकाबाई खरातसाळेगाव (नेर) - गौरखनाथ पाडमुखटाकरवन - मंगलबाई खडेकरएरंड वडगाव - ऊषा नरवडेसोलगव्हाण-कवठा - उमाजी तेलंगपाहेगाव - लहू चव्हाणनंदापूर - दत्तात्रय चव्हाणपोखरी (सिंदखेड) - लताबाई घडलिंगरामनगर - स्वाती शेजूळसावरगाव भागडे - शांताबाई अंभोरेपीर पिंपळगाव - मनिषा कोरडेनेर - खान बबीबाई दाऊद खान,शेवगा-सारवाडीशेवगा/सारवाडी-नेर - जयश्री कुपटकर (बिनविरोध),मजरेवाडी - परसुवाले मोहम्मद प्यारू (बिनविरोध)