शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे महापौरपद पाचव्यांदा महिला भूषवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 19:06 IST

सध्या महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

ठळक मुद्देपहिल्या महिला महापौर होत्या सुनंदा कोल्हे

औरंगाबाद : एप्रिल २०२० मध्ये महापालिकेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील महिलेला महापौरपदी आरूढ होण्याची संधी मिळणार आहे. औरंगाबादच्यामहापौरपदी विराजमान होणाऱ्या त्या पाचव्या महिला असतील. आज मुंबईत झालेल्या आरक्षण सोडतीत औरंगाबादचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले.  महापौरपदावर डोळा ठेवून राजकीय पक्ष उमेदवारी देतील. 

महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी यापूर्वी चार वेळेस राखीव झाले होते. १९९५ मध्ये सुनंदा कोल्हे या महापौर झाल्या होत्या. त्यानंतर २००४ मध्ये रुक्मिणीबाई शिंदे, २००७ मध्ये विजया रहाटकर, २०१२ मध्ये कला ओझा यांची निवड झाली होती. २०२० मध्ये खुल्या प्रवर्गातून महिला महापौर विराजमान होतील.  सध्या महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या पदावर विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले विराजमान आहेत. २९ आॅक्टोबर २०१७ रोजी  त्यांची महापौरपदी निवड झाली होती. अडीच वर्षांचा कार्यकाळ असल्यामुळे त्यांची मुदत २९ एप्रिल २०२० रोजी संपत आहे. 

पहिल्यांदाच प्रभाग पद्धत : महानगरपालिकेची निवडणूक ही प्रभाग रचना पद्धतीने पहिल्यांदाच एप्रिल २०२० मध्ये होणार आहे. प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी सुरूकेली आहे. प्रभाग रचना तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, चार वॉर्डांचा एक प्रभाग होणार आहे. त्यामुळे ५७ वॉर्ड महिलांसाठी राखीव असणार आहेत. प्रभाग रचना करताना भौगोलिक रचनेनुसार वॉर्ड एकमेकांना न जोडता वॉर्ड क्रमांकानुसार जोडले जातील असा अंदाज आहे.  

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMayorमहापौरAurangabadऔरंगाबाद