शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

नटूनथटून आल्या अन दर्शन रांगेत घुसल्या; थोड्यावेळाने कळले नवरीच्या गळ्यातील सोनसाखळी पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 19:04 IST

मकर संक्रांतीनिमित्ताने नाथमंदीर, गोदावरी घाटासह विठ्ठल मंदिरात वाण वाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती.

पैठण ( औरंगाबाद ) : मकरसंक्रांती निमित्त पैठण येथील नाथ मंदीर परिसरात दर्शनासाठी आलेली नवविवाहिता व एका वृध्देच्या गळ्यातील सोन्याची पोत महिला चोरट्यांनी लांबविली. विशेष म्हणजे, चोर असलेल्या महिला चांगल्या तयार होऊन आल्या होत्या. त्या मंदीरातील महिलांच्या गर्दीत घुसल्या होत्या. हे मंदीरातील सीसीटीव्ही फुटेज वरून समोर आले आहे.

मकर संक्रांतीनिमित्ताने शुक्रवारी नाथमंदीर, गोदावरी घाटासह विठ्ठल मंदिरात वाण वाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. सुमन मदन गोजरे (६५, रा नारळा ) व त्यांची सून वैष्णवी गोजरे याही नाथमंदीर परिसरात दर्शनासाठी आल्या होत्या. दरम्यान, परिसरातील विठ्ठल मंदिरात वाण वाहण्यासाठी महिलांची तोबा गर्दी झाली होती. याचा फायदा घेत गर्दीतील महिलेने वैष्णवीच्या गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची पोत  तोडून घेतली. 

तर, दुसऱ्या एका घटनेत नाथमंदिराच्या कमानीजवळ वृद्ध महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत तोडून नेण्यात आली. या प्रकरणी सुमन गोजरे यांनी पैठण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस नाईक गोपाळ पाटील यांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरविंद गटकुळ हे तपास करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादChain Snatchingसोनसाखळी चोरीCrime Newsगुन्हेगारी