शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कामावर महिला, फोटो पुरुषांचा; फुलंब्रीत पाणंद रस्त्याच्या १३ कामांत लाखोंचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:32 IST

फुलंब्री तालुक्यात रोहयोच्या पाणंद, सिमेंट रस्ते कामातील घोळ चव्हाट्यावर

- रऊफ शेखफुलंब्री ( छत्रपती संभाजीनगर) : रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात मातोश्री पाणंद रस्त्याच्या १३ कामांत महिला मजूर कामावर असताना पुरुष मजुरांचे काम करतानाचे ग्रुप फोटो वापरून लाखो रुपयांची बिले काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या ‘मातोश्री पाणंद रस्ते’ योजनेच्या ३३ गावांतील ९६ कामांमध्ये मजुरांचा काम करतानाचा एकच ग्रुप फोटो पुन्हा पुन्हा वापरून ५ कोटी १८ लाख रुपयांची बिले उचलण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर आता या प्रकरणात वेगळीच माहिती समोर आली आहे. तालुक्यात सुरू असलेल्या पाणंद रस्त्याच्या ९६ कामांपैकी १३ कामांवर महिला मजूर असताना त्या मस्टरमध्ये पुरुष मजुरांचे काम करतानाचे ग्रुप फोटो लावण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच खामगाव येथील पिराजी खरात हाऊस ते भीम वस्ती या मातोश्री पाणंद रस्त्याच्या मस्टर क्रमांक १२६७२ मध्ये जो मजुराचा फोटो अपलोड करण्यात आला आहे, तोच फोटो महालकिन्होळा या गावात सुरू असलेल्या गुऱ्हाळ वस्ती येथील कामाच्या मस्टर क्रमांक १२६८० मध्ये वापरण्यात आला आहे. धामणगाव येथील मातोश्री पाणंद रस्त्याच्या कामातील १० मस्टरमध्ये जो फोटो वापरला आहे, तोच फोटो सताळा पिंप्री येथील १० मस्टरमधील कामांसाठी अपलोड करून पैसे उचलण्यात आले आहेत.

निमखेडा येथे मातोश्री पाणंद रस्ता योजनेचे एक काम अर्धवट करण्यात आले. त्या कामाचे बिल काढण्यात येऊ नये, अशी तक्रार पंचायत समितीकडे केली असतानाही या कामाचे पूर्ण बिल उचलण्यात आले.- नामदेव खेत्रे, सरपंच, निमखेडा

शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत; पण न केलेल्या कामांचे पाच कोटी उचललेतालुक्यात रोहयोच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असताना फुलंब्री पंचायत समितीमधील संबंधित अधिकाऱ्यांनी या कामांची पडताळणी न करता डोळ्यावर पट्टी बांधून बिले काढली. विशेष म्हणजे रोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेत शेतकऱ्यांनी केलेल्या कामाची बिले काढण्यास निधी नसल्याचे कारण पंचायत समितीमधून देण्यात आले; परंतु मजुरांचा काम करतानाचा एकच ग्रुप फोटो ३३ गावांतील ९६ कामांमध्ये वापरून न केलेल्या कामांची तब्बल ५ कोटी १८ लाख रुपयांची बिले काढण्यासाठी अधिकाऱ्यांना निधी उपलब्ध झाल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfraudधोकेबाजी