शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:16 AM

जयभवानीनगरमधील नाल्यावरील अतिक्रमण हटविण्यास एका महिलेने विरोध करीत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे अतिक्रमण हटाव कारवाईला ब्रेक लागला असून, पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जयभवानीनगरमधील नाल्यावरील अतिक्रमण हटविण्यास एका महिलेने विरोध करीत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे अतिक्रमण हटाव कारवाईला ब्रेक लागला असून, पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना दोन मजली घर वाचविण्यासाठी नाला बाजूने वळविण्यात यावा, अशी मागणी करीत शकुंतलाबाई सोळुंके या महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेत जाळून घेण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस व महापालिका कर्मचा-यांनी तातडीने त्यांना रोखले. या घटनेनंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई तूर्तास थांबविण्यात आली.तेथील नाल्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडल्यानंतर आयुक्तांनी नाल्यातील अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी उपायुक्त रवींद्र निकम यांच्यावर दिली. त्यांनी कारवाईला विलंब केल्याने त्यांचे निलंबन केले. यानंतरही मनपा पथक नाल्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी जयभवानीनगराकडे फिरकले नाही. सोमवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी अचानक पाहणी करून अतिक्रमणे तशीच असल्याचे आढळले. त्यानंतर आयुक्तांनी फर्मान सोडताच मंगळवारी अतिक्रमण हटाव विभागाने मार्किंगनिहाय कारवाई सुरू केली.