शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

दुचाकीवरील महिलेला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:57 AM

मालवाहू ट्रक (ट्रेलर)ने दुचाकीस्वार महिलेला चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-नगर महामार्गावरील लिंकरोड चौफुलीवर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : मालवाहू ट्रक (ट्रेलर)ने दुचाकीस्वार महिलेला चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-नगर महामार्गावरील लिंकरोड चौफुलीवर घडली. या अपघातात महिला जागीच ठार झाली, तर महिलेचा पतीही गंभीर जखमी झाला आहे.याविषयी अधिक माहिती अशी की, राजू काशीनाथ सोनवणे (४०, रा. हरिकृपानगर, देवळाई परिसर) व त्यांची पत्नी संगीता सोनवणे हे दोघे दुचाकी क्रमांक एम.एच.२०, बी.ए.७२२२ वर स्वार होऊन परसोडा, ता. वैजापूर येथे वडिलांना भेटण्यासाठी चालले होते. बीड बायपासकडून लिंकरोडमार्गे वैजापूरकडे जात असताना सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास लिंकरोड चौफुलीजवळ समोरून जाणाºया मालवाहू ट्रक (ट्रेलर) क्रमांक एन.एल.०१, एल.६२९२ च्या चालकाने अचानक वळण घेतल्यामुळे दुचाकीस्वार राजू सोनवणे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दोघे पती-पत्नी ट्रकखाली सापडले. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली चिरडल्यामुळे संगीता सोनवणे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे निरीक्षक मनोज पगारे, सहायक फौजदार ढवळे, पोकॉ. शमशुद्दीन कादरी, पोहेकॉ. कवडे, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. जगदाळे आदींनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमी राजू सोनवणे यास मदत करीत त्यास धीर दिला. या अपघातात गंभीर जखमी राजू सोनवणे यांना उपचारासाठी, तर ठार झालेल्या त्यांच्या पत्नी संगीता सोनवणे यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर मारहाणीच्या भीतीमुळे ट्रकचालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता. या अपघातानंतर लिंकरोड चौफुलीवर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. याप्रकरणी जखमी राजू सोनवणे याचा चुलत भाऊ भरत सोनवणे याच्या तक्रारीवरून ट्रकचालक अजयकुमार बिहारीलाल (२२, रा. ईस्माईलपूर, पो.कारगापूर, ता. सोरावन, जि.अलाहाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली. या अपघातास कारणीभूत मालवाहू ट्रकमध्ये दोन मिनी ट्रकची वाहतूक करीत असताना हा अपघात घडून संगीता सोनवणे यांचा या अपघातात बळी गेला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गौतम खंडागळे करीत आहेत.