शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने मोपेडवरील महिलेला चिरडले; येवला रोडवरील अतिक्रमणाचा ठरल्या बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 19:18 IST

नागरिकांनी येवला रोडवर गवंडगाव शिवारात ट्रकला पकडले. मात्र चालक पसार झाला.

वैजापूर (औरंगाबाद): भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने उडविल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी वैजापूर येवला रस्त्यावर भाजी मंडई समोर घडली.प्रतिक्षा राजेंद्र चौधरी (४०, रा.सभाजीनगर काॅलनी वैजापूर )  असे मृत महिलेचे नाव आहे.

प्रतीक्षा चौधरी या सकाळी त्यांच्या मोपेडवरून सासरे गुलाब भट्टू चौधरी यांना बसस्थानकावर सोडण्यासाठी जात होत्या. येवला रस्त्यावरून जात असताना भाजी मंडई समोर वैजापूरहून येवलाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने पाठीमागून मोपेडला जोराची धडक दिली. या अपघातात प्रतीक्षा यांचा जागेवर मृत्यू झाला. अपघातात सापडून ट्रक अंगावरून गेल्याने प्रतीक्षा यांचा अक्षरक्ष चेंदामेंदा झाला. तर सासरे गुलाब चौधरी हे किरकोळ जखमी झाले. अपघात झाल्यानंतर चालक ट्रक घेऊन पळून गेला.

नागरिकांनी येवला रोडवर गवंडगाव शिवारात ट्रकला पकडले. मात्र चालक पसार झाला. नागरिकांनी क्लीनरला पोलीसांच्या ताब्यात दिले. मृत प्रतीक्षा या विमा एजंट होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पती राजेंद्र खासगी शाळेत शिक्षक आहेत. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

रस्त्यावरील अतिक्रमणाचा बळी ठरल्यावैजापूर-येवला हा राष्ट्रीय महामार्ग आहे.या मार्गावर शहरात भाजी मंडई आहे. भाजी मंडई परीसरात अनेक फळ विक्रेते हे या रस्त्यावर आपली दुकाने लावतात.त्यामुळे येथे गर्दी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होतो. प्रशासकीय यंत्रणा मात्र या बाबींकडे दुर्लक्ष करतात.त्यामुळे किरकोळ अपघात मात्र येथे कायमच होत असतात.याच अतीक्रमणाचा आज प्रतीक्षा चौधरी या बळी ठरल्या आहेत.

 

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद